शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नाशकात सातपूर-पश्चिम विभागातील धार्मिक स्थळांवर कारवाई, २१ अनधिकृत बांधकामे हटवली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2017 19:45 IST

किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत

ठळक मुद्देधार्मिक स्थळांमधील मूर्ती काढण्यापूर्वी पुरोहिताच्या माध्यमातून विधिवत पूजन नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने मोहीम शांततेत

सातपूर : महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाने गुरुवारी (दि.९) सातपूर आणि पश्चिम विभागातील २१ अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली. किरकोळ विरोध वगळता मोहीम शांततेत पार पडली. दरम्यान, महापालिकेच्या या मोहिमेमुळे धार्मिक स्थळे वाचविण्यासाठी पंचवटी, नाशिक पूर्व विभागातील काही विश्वस्तांनी न्यायालयात जाण्याची तयारी चालविली आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार बुधवारी (दि.८) सिडको विभागापासून महानगरपालिकेच्या अतिक्र मण विरोधी पथकाने धडक कारवाईला सुरुवात केली. गुरुवारी (दि.९) सातपूर विभागात सकाळी ९ वाजता मोहिमेस प्रारंभ करण्यात आला. मोहीम सुरू करण्यापूर्वी सातपूर पोलीस ठाण्यात मोहिमेतील पोलिसांचा फौजफाटा हजर झाला. महानगरपालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने मोहिमेचा आराखडा तयार केला. सुरुवातीला पोलीस ठाण्यासमोरील रस्त्याच्या कडेला असणारी दोन धार्मिक स्थळे हटवून ही मोहीम महादेववाडीत गेली. तेथील दोन धार्मिक स्थळे हटविण्यात आली. त्यानंतर सातपूर कॉलनीत श्री छत्रपती विद्यालयालगतची तीन धार्मिक स्थळे, श्री सप्तशृंगी मंदिराजवळील दोन धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई पार पाडण्यात आली. जुन्या कॉलनीतील दोन धार्मिक स्थळे आणि श्रमिकनगर येथील एक धार्मिक स्थळ अशी एकूण १२ धार्मिक स्थळे जेसीबीच्या सहाय्याने जमीनदोस्त करण्यात आली. धार्मिक स्थळांमधील मूर्ती काढण्यापूर्वी पुरोहिताच्या माध्यमातून विधिवत पूजन करून घेण्यात आले. त्यानंतर मूर्ती संबंधितांच्या हवाली करण्यात आली. दोन-तीन ठिकाणी झाडाखाली देवदेवतांच्या फोटोफ्रेम ठेवण्यात आल्या होत्या. त्या सुद्धा मोहीमेदरम्यान काढून घेण्यात आल्या.बहुतांश धार्मिक स्थळे हटविण्यासाठी नागरिकांनी स्वत:हून सहकार्य केले. नागरिकांनी सहकार्याची भूमिका घेतल्याने मोहीम शांततेत पार पडली.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNashikनाशिक