शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

कारवाई : आंदोलक, निर्दोष सुटलेल्यांनाही बडगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 00:47 IST

नाशिकरोड : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू असून, दरम्यानच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राजकीय-सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पोलीस प्रशासनाकडून फौजदारी प्रक्रियासंहिता कलम १४९ अन्वये नोटिसा बजाविण्यात येत आहे. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले असून काही जणांच्या बाबतीत ‘गव्हासोबत किडे रगडले जात’ असल्याचे बोलले जात आहे.

नाशिकरोड : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने आदर्श आचारसंहिता लागू असून, दरम्यानच्या काळात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून राजकीय-सामाजिक पदाधिकारी, कार्यकर्ते यांना पोलीस प्रशासनाकडून फौजदारी प्रक्रियासंहिता कलम १४९ अन्वये नोटिसा बजाविण्यात येत आहे. यामुळे संबंधितांचे धाबे दणाणले असून काही जणांच्या बाबतीत ‘गव्हासोबत किडे रगडले जात’ असल्याचे बोलले जात आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होता निवडणूक शांततामय व लोकशाही मार्गाने पार पडावी याकरिता पोलीस प्रशासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून पोलीस प्रशासनाकडून आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, राजकीय पक्ष, आंदोलन आदी ठिकाणी सहभाग राहिलेल्या आजी-माजी पदाधिकारी व कार्यकर्त्यांना नोटीस बजाविण्यात येत आहे.निवडणुकीच्या प्रचारादरम्यान संबंधितांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग असण्याची शक्यता आहे. त्यामुळे उमेदवार अथवा मतदारांवर दडपण आणू नये. तसेच अन्य कोणत्याही मार्गाने अनुयायी अथवा समर्थकांकडून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये अथवा तसे कृत्य करण्यास कोणाला भाग पाडू नये. संबंधिताच्या कृतीने काही गैरप्रकार घडला तर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. याकरिता देण्यात येत असलेली फौजदारी प्रक्रिया संहिता कलम १४९ ची नोटीस न्यायालयात पुरावा म्हणून सादर करण्यात येईल असा मजकूर असलेली नोटीस पोलीस प्रशासनाकडून बजाविण्यात येत आहे.इन्फो.....इन्फो...नोटिसीबाबत आश्चर्यआदर्श आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून राजकीय-सामाजिक क्षेत्रातील आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्त्यांना नोटीस बजाविण्यात येत आहे. मात्र काही लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा गैरप्रकाराशी कुठलाही संबंध नाही. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केला नाही. पक्षाच्या निर्णयानुसार लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभाग घेतला आहे. काहीजण राजकारण, निवडणूक यांच्यापासून काही वर्षांपूर्वीच अलिप्त झाले आहेत. त्यांनादेखील नोटिसा बजाविण्यात येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गव्हासोबत किडे रगडण्याचा प्रकार चुकीचा असल्याचे बोलले जात आहे. अनेकांचे धाबे दणाणलेपोलीस प्रशासनाकडून कायदा-सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून आजी-माजी लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, राजकीय पक्षाशी संलग्न अथवा राजकीय आंदोलनात सहभागी असलेल्या सर्वांनाच नोटिसा बजाविण्यात येत आहे. गेल्या काही वर्षांपासून राजकीय पक्ष, आंदोलन आदींपासून अलिप्त झालेल्या पूर्वाश्रमीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनादेखील नोटीस देण्यात येत असल्याने ते त्रस्त झाले आहे, तर काहीजणांना नोटीस बजाविताना आमच्यावरील सर्व गुन्हे, आरोप निकाली निघाले असून, न्यायालयाने निर्दोष सोडले आहे तरी का नोटीस देता अशी विचारणा केली जात आहे; मात्र पोलीस प्रशासनाकडून कायदेशीर प्रक्रिया असल्याचे सांगून नोटीस ‘दिलीच’ जात आहे.