शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक जिल्ह्यातील सातशे बीएलओंवर कारवाईची टांगती तलवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 19:06 IST

नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदार संघात सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या आहेत, परंतु एकूण साडेसात लाख कुटुंबाना अद्यापही भेटी देण्याचे काम बाकी आहे.

ठळक मुद्देमतदार यादी अद्यावतीकरण : काम करण्यास दिला नकारगुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या आहेत

नाशिक : निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या मतदार पुर्नरिक्षण कार्यक्रमांतर्गंत मतदार यादी अद्यावतीकरण करण्याच्या कामास नकार देणारे तसेच संथ काम करणा-या केंद्रस्तरीय अधिकाºयांवर (बीएलओ) जळगाव जिल्ह्यात गुन्हे दाखल करण्यात आल्याने तशाच स्वरूपाची कारवाई जिल्ह्यातील कामचुकार बीएलओंवर करण्याचा विचार निवडणूक शाखेने सुरू केला असून, त्यासाठी सर्व तहसिलदारांना पत्र पाठवून माहिती गोळा करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.नाशिक जिल्ह्यातील पंधराही विधानसभा मतदार संघाच्या मतदार याद्यांचे अद्यावतीकरणाचा कार्यक्रम १ नोव्हेंबरपासून सुरू करण्यात आला असून, १५ ते ३० नोव्हेंबर या काळात मतदान केंद्र निहाय बीएलओंची नेमणूक करून त्यांच्याकरवी घरोघरी जाऊन मतदार सर्व्हेक्षण करण्यात येत आहे. परंतु जिल्ह्यातील अपवाद वगळता एकाही विधानसभा मतदार संघात गेल्या पंधरा दिवसात समाधानकारक काम झालेले नाही. बीएलओ म्हणून बहुतांशी शिक्षकांची नेमणूक करण्यात आली असून, त्यांनी दैनंदिन शैक्षणिक कामे सांभाळून फावल्या वेळेत प्रत्येक मतदाराच्या घरी जावून माहिती संकलित करण्याचे काम करणे अपेक्षित आहे. त्यासाठी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदार संघात सुमारे साडेतीन हजार बीएलओंची नेमणूक करण्यात आली असतानाही प्रत्यक्षात त्यामानाने काम मात्र सुरू झालेले नाही. काही बीएलओंनी प्रामाणिकपणे काम सुरू केल्याने गुरूवारी सायंकाळपर्यंत सुमारे १९ हजार घरभेटी देण्यात आल्या आहेत, परंतु एकूण साडेसात लाख कुटुंबाना अद्यापही भेटी देण्याचे काम बाकी आहे. राज्य निवडणूक आयोगाने अलिकडेच घेतलेल्या आढाव्यात ही बाब स्पष्ट झाल्याने निवडणूक शाखेने दहा तहसिलदारांना नोटीसा बजावल्या आहेत, त्यात जे बीएलओ काम करीत नसतील त्यांच्यावरही निवडणूक कायद्यान्वये कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. जळगाव जिल्ह्यात मतदार याद्यांचे काम न करणाºया काही बीएलओंवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने त्याच धर्तीवर नाशिक जिल्ह्यातील काम चुकारांवर कारवाई करता येऊ शकते असे निवडणूक शाखेचे म्हणणे आहे. जिल्ह्यातील जवळपास सातशे बीएलओंनी अद्यापही काम सुरू केलेले नाही, त्यांच्यावर प्रामुख्याने कारवाई करण्याचे संकेत निवडणूक शाखेने दिले आहेत.

टॅग्स :Electionनिवडणूकnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय