शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक पुरवठा खात्याची कारवाई विधीमंडळात चर्चेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2018 15:13 IST

नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्याबाबत केल्या जाणा-या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिकाºयांनी पुरवठा खात्याचे दप्तर तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका निदर्शनास आल्या होत्या व त्यावरून पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले आहे

ठळक मुद्देअधिकारी मोकळे : आधार सिडींगचा प्रश्न उपस्थित पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले

नाशिक : नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्यातील अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचारी निलंबीत करण्याची कार्यवाही केली असली तरी, या साऱ्या प्रकरणात दोषी अधिका-यांवर काय कारवाई केली तसेच आधार सिडींगचे काम करणा-या ठेकेदाराला काम पुर्ण न करताच देयके कशी अदा केली आदी पुरवठा खात्याशी निगडीत प्रश्न राज्य विधीमंडळाच्या अधिवेशनात उपस्थित करण्यात आले आहेत. त्यामुळे पुरवठा खाते पुन्हा एकदा चर्चेत आले आहे.नाशिक तहसिल कार्यालयातील पुरवठा खात्याबाबत केल्या जाणा-या तक्रारींची दखल घेत जिल्हाधिका-यांनी पुरवठा खात्याचे दप्तर तपासणी केली असता त्यात अनेक गंभीर स्वरूपाच्या चुका निदर्शनास आल्या होत्या व त्यावरून पुरवठा अव्वल कारकूनला निलंबीत करण्यात आले आहे. कारवाईचा धागा पकडत आमदार सीमा हिरे यांनी या संदर्भात अधिवेशनात प्रश्न विचारला आहे. पुरवठा खात्याच्या अनागोंदी कारभाराबद्दल कर्मचा-यांवर कारवाई करण्यात आली असेल तर अधिका-यांवर काय कारवाई केली अशी विचारणा करण्यात आली आहे. या शिवाय पुरवठा विभागाने आधार सिडींगचे कामे दिलेल्या ठेकेदाराने काम पुर्ण केलेले नसताना त्याला देयके कशी अदा केली, आधार सिडींगसाठी रेशन दुकानदारांकडून वेळोवेळी पैसे घेण्यात आलेले असतानाही काम पुर्ण का होऊ शकले नाही अशी विचारणा करण्यात आली आहे. त्याच बरोबर पॉस यंत्राबाबत रेशन दुकानदारांच्या असलेल्या तक्रारींबाबतही प्रश्न उपस्थित केला आहे. नाशिक शहर धान्य वितरण अधिका-यांच्या मनमानी कारभाराबाबत देखील रेशन दुकानदारांच्या असलेल्या तक्रारींवर काय कार्यवाही करण्यात आली अशी विचारणा करण्यात आली आहे. विधीमंडळ अधिवेशनातच थेट पुरवठा खात्याच्या कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करण्यात आल्याने पुरवठा खाते चर्चेत आले आहे.

टॅग्स :GovernmentसरकारNashikनाशिक