शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात सर्व पक्षीय हॉकर्स कृती समितीचा मोर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2018 15:46 IST

बी. डी. भालेकर मैदानावरून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा काढण्यात आला. शालीमार चौक, शिवाजी रोडने मध्यवर्ती बस स्थानक चौक व तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी नाशिक महापालिका व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

ठळक मुद्देनाशिक महापालिका व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी शेकडो हॉकर्स, टपरीधारकांचा लाखो रूपयांचा माल जप्त

नाशिक : शहरातील बेरोजगार व गोरगरिब हॉकर्स, टपरीधारकांविरूद्ध महापालिकेने सुरू केलेल्या अतिक्रमण मोहिमेच्या विरोधात सर्व पक्षीय हॉकर्स कृती समितीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. राष्टÑीय फेरीवाला धोरणाची अंमबजावणी करण्यात यावी यासह विविध मागण्या यावेळी मोर्चेक-यांनी केल्या.बी. डी. भालेकर मैदानावरून सकाळी अकरा वाजता हा मोर्चा काढण्यात आला. शालीमार चौक, शिवाजी रोडने मध्यवर्ती बस स्थानक चौक व तेथून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला. यावेळी नाशिक महापालिका व आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील भाजपा सरकारने मुद्दाम स्थानिक भुमीपूत्रांना बेघर व बेरोजगार करण्याचे षडयंत्र रचल्याचा आरोपही यावेळी करण्यात आला. जिल्हाधिका-यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील बेघर, बेरोजगार शोषीत, पिडीत, अपंग, गोरगरिब, दलीत, आदिवासी, अल्पसंख्यांक समाजाला त्रास देण्याचे काम महापालिकेच्या माध्यमातून सुरू करण्यात आले असून, हॉकर्स, टपरीधारकांना उद्धवस्त करून रोजीरोटीपासून वंचित केले जात आहे. आयुक्तपदी तुकाराम मुंढे आल्यापासून त्यांनी बदली सत्र नावाखाली महापालिकेतील मागासवर्गीय कामगारांच्या जाणिवपुर्वक बदल्या करून त्यांना मानसिक व आर्थिक त्रास देण्याचे काम सुरू केले असून, त्याचाच भाग म्हणून शहरातील शेकडो हॉकर्स, टपरीधारकांचा लाखो रूपयांचा माल जप्त करून ठेवला आहे तो त्वरीत परत करण्यात यावा अशी मागणीही करण्यात आली आहे. अतिक्रमण विभागाच्या अधिका-यांची चौकरी करून त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, नाशिक मधील ३५ ते ४० वर्षापुर्वीच्या झोपड्यांचे सर्व्हेक्षण करून त्यांचे आहे त्याच जागेवर पुनवर्सन करण्यात यावे व महापालिकेने त्यांना नागरी सुविधा पुरवाव्यात व एकतर्फी राबविण्यात येत असलेली अतिक्रमण मोहिम त्वरीत थांबविण्यात यावी आदी मागण्याही करण्यात आल्या आहेत. याआंदोलनात पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे जिल्हाध्यक्ष शशी उन्हवणे, हॉकर्स सेनेचे जिल्हाध्यक्ष शिवाजी भोर, पुष्पा वानखेडे, मुरली घोरपडे, सिताबाई भागकाडे, सुनिता कर्डक, देविदास डोके, इमरान शेख यांच्यासह शेकडो मोर्चेकरी सहभागी झाले होते.

टॅग्स :PoliticsराजकारणNashikनाशिक