शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

नियमभंग करणाºया नागरिकांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2020 00:18 IST

देवळा : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार झाली असून, त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाविषयी बेफिकिरी दाखवत नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांनी पाच कंदील परिसरात मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली. देवळा नगरपंचायतीने शहरात कोरोनाबाबत नियमांचे पालन न करणाºया नागरिकांवर कारवाई करत ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून, आतापर्यंत २५ हजार रूपयांचा दंड वसूल झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे.

ठळक मुद्देदेवळा : २५ हजार रुपयांचा दंड वसूल; बरे होण्याच्या प्रमाणात वाढ

देवळा येथील पाच कंदील चौकात कोरोना संबंधित नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहनचालकांवर कारवाई करताना पोलीस व नगरपंचायतीचे कमर्चारी.

 

 

लोकमत न्यूज नेटवर्कदेवळा : तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या दोनशे पार झाली असून, त्यात सातत्याने वाढ होत असल्यामुळे कोरोनाविषयी बेफिकिरी दाखवत नियमांचे उल्लंघन करणाºया नागरिकांवर पोलिसांनी पाच कंदील परिसरात मोहीम राबवत दंडात्मक कारवाई केली. देवळा नगरपंचायतीने शहरात कोरोनाबाबत नियमांचे पालन न करणाºया नागरिकांवर कारवाई करत ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला असून, आतापर्यंत २५ हजार रूपयांचा दंड वसूल झाला असल्याची माहिती मुख्याधिकारी संदीप भोळे यांनी दिली आहे.शहरासह तालुक्यात कोरोना रुग्णांची संख्या नियमितपणे वाढत असून, देवळा शहर कोरोनाचा हॉटस्पॉट होण्याच्या दिशेने वाटचाल करीत आहे. बरे होणाºया रुग्णांचे प्रमाण मोठे असल्यामुळे थोडाफार दिलासा मिळत आहे. देवळा तालुक्यात शहरासह ग्रामीण भागातदेखील नागरिक गंभीर असून, शासनाने सुचविलेल्या नियमांचे पालन करताना दिसत आहे. मात्र काही बेफिकीर युवक व नागरिक कारण नसताना आपल्या दुचाकीवरून तोंडाला मास्क न लावता भटकत असतात. मागील चार महिन्यात पोलिसांनी व नगरपंचायतीने अधूनमधून कारवाई केल्यामुळे अशा बेजबाबदार नागरिकांना शिस्त लागल्याचे चित्र दिसून येत होते. परंतु आठवडाभरात पुन्हा परिस्थिती जैसे थे होत होती. आरोग्य विभाग, पोलीस व महसूल यंत्रणा घेत असलेल्या परिश्रमामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची संख्या सध्या आटोक्यात असल्याचे चित्र दिसत आहे.पालिकेकडून एका दिवसात ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूलदेवळा नगरपंचायत प्रशासनामार्फत नागरिकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत; मात्र नागरिकांकडून मास्क न वापरणे, सामाजिक अंतर, रस्त्यावर थुंकणे आदी नियमांचे होणारे उल्लंघन चिंताजनक आहे. नगरपंचायत प्रशासनाने बुधवारी शहरातील पाच कंदील, निमगल्ली व बाजारपट्टी परिसरात नियमांचे पालन न करणाºया नागरिकांवर दंडात्मक कारवाई करून ६ हजार २०० रुपयांचा दंड वसूल केला आहे.

टॅग्स :PoliceपोलिसTravel Tipsट्रॅव्हल टिप्स