शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकमध्ये उद्यापासून रस्त्यांवरील अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 7, 2017 20:09 IST

महापालिकेची यंत्रणा सज्ज : रस्त्यांवरील धार्मिक स्थळे हटविणार

ठळक मुद्दे१५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध बुधवार (दि. ८) पासून कारवाईची तयारी पूर्णमहापालिकेला अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करायची आहे

नाशिक : अनधिकृत धार्मिक स्थळांबाबत होणाऱ्या कारवाईविरोधी हिंदुत्ववादी संघटनांमार्फत नाशिक बंदची हाक दिली गेली असतानाच, महापालिकेने मात्र रस्त्यांवर अडथळा ठरणाऱ्या १५० अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध बुधवार (दि. ८) पासून कारवाईची पूर्ण तयारी केली आहे. सिडको आणि सातपूरमधील रस्त्यांवर अडथळा ठरणाºया धार्मिक स्थळांविरुद्ध बुधवारी कारवाई केली जाणार असून, त्यासाठी महापालिका व पोलीस यंत्रणा सज्ज असल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी दिली आहे.न्यायालयाच्या निर्देशानुसार, महापालिकेला अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्ध येत्या १७ नोव्हेंबरपर्यंत कारवाई पूर्ण करायची आहे. त्यानुसार महापालिकेने सन २००९ पूर्वीच्या १५० अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून, पोलीस बंदोबस्तात बुधवार (दि. ८) पासून मोहीम राबविण्यात येणार आहे. मोहिमेची सुरुवात सिडको आणि सातपूर विभागातून केली जाणार आहे. सिडकोतील आठ धार्मिक स्थळांऐवजी दोन धार्मिक स्थळे खुल्या जागांमधील असल्याने सहा धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे, तर सातपूर विभागातील नऊ धार्मिक स्थळांविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. महापालिकेने मोहिमेची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठी अतिक्रमण विभागाचे ३० कर्मचारी तैनात केले जाणार असून, सहाही विभागीय अधिकाऱ्याना प्राधिकृत करण्यात आले आहे. याशिवाय, नगररचना आणि बांधकाम विभागाचेही अभियंते उपस्थित राहणार आहेत. धार्मिक स्थळ हटविण्यापूर्वी पुरोहितामार्फत विधिवत पूजा केली जाणार आहे. मूर्ती सहजतेने हटविण्यासाठी ड्रील मशीनचा वापर केला जाणार असून, डेब्रीज उचलण्यासाठी बांधकाम विभागामार्फत डम्परची व्यवस्था असणार आहे. याशिवाय, दोन जेसीबी तैनात ठेवण्यात येणार आहेत. संपूर्ण मोहिमेचे व्हिडीओ चित्रीकरणासह छायाचित्रण केले जाणार आहे. दरम्यान, मोहिमेप्रसंगी कुणी पुरावे सादर केल्यास नगररचना विभागाच्या अभिप्रायानंतर कारवाईबाबत पुनर्विचार होऊ शकतो, असेही उपआयुक्त रोहिदास बहिरम यांनी सांगितले. महापलिकेने यापूर्वी पहिल्या टप्प्यात सन २००९ नंतरच्या १०५ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई केलेली आहे.

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाNashikनाशिक