पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पिंपळगाव ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.कोरोना संसर्गजन्य रोगापासून बचाव व खबरदारी म्हणून पिंपळगाव शहर व परिसरात अत्यावश्यक सेवा वगळता शनिवारी-रविवारी दुकाने पूर्णत: बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. या आदेशानुसार नियम मोडणाऱ्यांविरोधात आरोग्य विभाग, पोलीस, ग्रामपंचायत व महसूल प्रशासन यांना कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. दरम्यान, छुप्या पद्धतीने शटर बंद ठेवून आतमध्ये काम सुरु ठेवणाऱ्या व्यावसायिकांवर ग्रामपंचायत, पोलीस प्रशासन व महसूल प्रशासनाकडून तीस हजारांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, नीलकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव यांच्यासह कर्मचाऱ्यांनी केली.पोलीस, ग्रामपंचायत, महसूल प्रशासनामार्फत पुढील पाच दिवस शहरात जनता कर्फ्यू असणार आहे, त्याला नागरिकांनीही सहकार्य करावे. अन्यथा नियम मोडणारे मुजोर व्यावसायिक व नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली जाईल.- भाऊसाहेब पटारे, पोलीस निरीक्षक, पिंपळगाव बसवंतनागरिकांनी सतर्कता बाळगावीजागतिक महामारी असणारा कोरोना जनसंसर्ग रोगाची दुसरी लाट आली असून, दररोज बधितांचा आकडा हजारोने वाढत असून, शेकडो नागरिक मृत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे आपले कुटुंब, समाज, गाव सुरक्षित ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांने जबाबदारी म्हणून काळजी घेणे गरजेचे आहे. त्यासाठी प्रशासनाला सहकार्य करून नियमित माक्स, सॅनिटायझर व गर्दीचे ठिकाण टाळून फिजिकल डिस्टन्स पाळले पाहिजे.ग्रामविकास अधिकारी लिंगराज जंगम, पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पटारे, मंडल अधिकारी नीलकंठ उगले, तलाठी राकेश बच्छाव आदींनी दुकानदारावर धडक कारवाई केली.
नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:17 IST
पिंपळगाव बसवंत : कोरोनाच्या वाढत्या रूग्णसंख्येमुळे पिंपळगाव ग्रामपंचायत, महसूल व पोलीस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या १० व्यावसायिकांवर धडक कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ३० हजारांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
नियम मोडणाऱ्या दुकानदारांवर कारवाई
ठळक मुद्दे३० हजारांचा दंड वसूल : पिंपळगाव ग्रामपंचायत, पोलीस व महसूल प्रशासन ॲक्शन मोडमध्ये