शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

धार्मिक स्थळांविरोधात ८ पासून कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2017 00:49 IST

महापालिकेमार्फत न्यायालयाच्या निर्देशानुसार, येत्या ८ नोव्हेंबरपासून शहरातील रस्त्यांना अडथळा ठरणारी १५०, तर सन २००९ नंतरची मोकळ्या भूखंडांवरील ७१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात झालेल्या समितीच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला व त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.

नाशिक : महापालिकेमार्फत न्यायालयाच्या निर्देशानुसार, येत्या ८ नोव्हेंबरपासून शहरातील रस्त्यांना अडथळा ठरणारी १५०, तर सन २००९ नंतरची मोकळ्या भूखंडांवरील ७१ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे. अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांच्या दालनात झालेल्या समितीच्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला व त्यादृष्टीने नियोजन करण्याचे निश्चित करण्यात आले.न्यायालयाच्या निर्देशानुसार महापालिकेला ३० नोव्हेंबरच्या आत अनधिकृत धार्मिक स्थळांविरुद्धची कारवाई पूर्ण करून तसा अहवाल न्यायालयाला सादर करावयाचा आहे. सदर कारवाईच्या संदर्भात अतिरिक्त आयुक्तांकडे मंगळवारी (दि.३१) महापालिकेच्या अधिकाºयांसह पोलीस आयुक्तालय, म्हाडा, एमआयडीसी आणि सिडको यांच्या प्रतिनिधींची संयुक्त बैठक झाली. यावेळी, सन २००९ पूर्वीची रस्त्यांना अडथळा ठरणारी १५० अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे निश्चित करण्यात आले. त्यात महापालिका हद्दीतील १४२ धार्मिक स्थळे असून, सिडको हद्दीतील आठ धार्मिक स्थळे आहेत. याशिवाय, सन २००९ नंतरची परंतु मोकळ्या भूखंडांवर उभारण्यात आलेली ७१ अनधिकृत धार्मिक स्थळेही हटविण्यात येणार आहेत. त्यात मनपा हद्दीतील ५७, तर सिडको हद्दीतील १४ धार्मिक स्थळांचा समावेश आहे. सन २००९ नंतरची एकूण ६६९ धार्मिक स्थळे आहेत. त्यातील ५०० हून अधिक धार्मिक स्थळे ही मोकळ्या भूखंडांवर साकारण्यात आलेली आहेत.  महापालिकेने आतापर्यंत केलेल्या कारवाईत १०५ अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई केलेली आहे. दरम्यान, निष्काशीत करण्यात येणाºया धार्मिक स्थळांसंदर्भात संबंधितांकडून पुरावे व दस्तावेज मागविण्यात आले होते. परंतु, ज्यांनी पुरावे, दस्तावेज सादर केलेले नाहीत अशी अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याची कारवाई केली जाणार आहे. मात्र, अजूनही कुणी ठोस पुरावे सादर केल्यास त्याबाबत पुनर्विचार शक्य असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त किशोर बोर्डे यांनी दिली. १० टक्के बांधकामाचा प्रस्तावमहापालिकेच्या मालकीच्या मोकळ्या भूखंडांवर १० टक्के बांधकाम करण्याची तरतूद आहे. परंतु, त्यात लोकोपयोगी असेच प्रकल्प उभारण्यास मान्यता आहे. त्यामुळेच समाजमंदिरे, सभामंडपे, व्यायामशाळा उभ्या राहिलेल्या आहेत. परंतु, १० टक्के बांधकामात धार्मिक स्थळं उभारण्याची तरतूद नाही. मात्र, यापुढे सदर १० टक्के बांधकामात धार्मिक स्थळांचेही बांधकाम अनुज्ञेय करण्यासंदर्भातील प्रस्ताव महासभेवर ठेवण्यात येणार असून, महासभेच्या मंजुरीनंतर सदरचा प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती नगररचनाचे सहायक संचालक आकाश बागुल यांनी दिली.