शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

मालेगावी प्लॅस्टिक कारखान्यांविरोधात कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 01:41 IST

शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना लागलेल्या वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्लॅस्टिक कारखाने व गुदाममालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसेच संबंधित कारखाना मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई, वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त राजू खैरनार, अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मालेगाव : शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना लागलेल्या वाढत्या आगींच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने प्लॅस्टिक कारखाने व गुदाममालकांविरुद्ध कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. बुधवारपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामे हटविण्यासाठी विशेष मोहीम राबविली जाणार आहे. तसेच संबंधित कारखाना मालकांविरुद्ध फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई, वीज व पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपा उपायुक्त राजू खैरनार, अग्निशमन अधीक्षक संजय पवार यांनी पत्रकार परिषदेत दिली. गेल्या पंधरा दिवसांपासून शहरातील प्लॅस्टिक कारखाने व गुदामांना आग लागत आहेत. या आगींच्या घटनांमध्ये नागरी वसाहतीला धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील १२५ प्लॅस्टिक कारखानदारांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. तसेच या बेकायदेशीर कारखान्यांवर प्रादेशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने कारवाई करावी, असे पत्र देण्यात आले आहे. २०१६ साली ७८ प्लॅस्टिक पाइप गिट्टी कारखान्यांविरोधात प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे तक्रार नोंदविण्यात आली आहे. या आगींच्या घटनांच्या वाढीमुळे प्रभाग अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. या बैठकीत शहरातील कारखाने व गुदामांची पाहणी करून स्थळ निरीक्षण अहवाल तयार करून सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.  बुधवारपासून पोलिसांच्या मदतीने चारही प्रभागात ही कारवाई केली जाणार आहे. तसेच शासनाच्या प्लॅस्टिकबंदी अध्यादेशाप्रमाणे प्लॅस्टिक वाहतूक, आयात, पुनर्निमिती करणाºयांची बैठक घेऊन त्यांना सूचना देण्यात येणार आहे. या अध्यादेशाचे उल्लंघन केल्यास पहिला दंड पाच हजार, दुसरा दहा व तिसरा पंचवीस हजार रुपये दंड व फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. अक्सा कॉलनी व स्टार हॉटेलच्या पाठीमागे लागलेल्या आगीच्या घटनेतील मालकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे तसेच प्लॅस्टिक कारखाने व गुदामांचा वीज व पाणीपुरवठा खंडित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहेत. तसेच १९८८ व्यवसाय व आस्थापनाधारकांना फायर आॅडिटची नोटीस बजावण्यात आली आहे.  जैविक कचरा टाकल्यास मनपा आयुक्तांचे गुन्हे दाखल करण्याचे आदेश  वॉटरग्रेस कंपनीकडून सध्या शहरात जैविक कचरा उचलला जातो; मात्र खासगी डॉक्टरांनी ठेकेदार बदलण्याची मागणी केली आहे. खासगी डॉक्टर व रुग्णालयांनी उघड्यावर व महापालिकेच्या कचराकुंड्यांमध्ये जैविक कचरा टाकल्यास त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याचे आदेश मनपा आयुक्त संगीता धायगुडे यांनी दिले आहे.महापालिकेने पावसाळ्यापूर्वी शहरातील २७ लहान-मोठ्या नाल्यांची साफसफाईचे काम हाती घेतले आहे. जाफरनगर, कालीकुट्टी, डेपो परिसरातील नाले सफाई सुरू करण्यात आली आहे. यासाठी चार जेसीबी, सहा स्वच्छता निरीक्षक व १८ कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. मोसम नदी किनाºयावरील झोपडपट्टीधारकांनाही नोटिसा बजावण्यात आल्या आहे.

टॅग्स :Plastic banप्लॅस्टिक बंदी