शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

रविवार कारंजावर अतिक्रमण विरोधी मोहीम मनपाची कारवाई : ५० व्यापाºयांना नोटिसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2017 01:01 IST

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.२९) रविवार कारंजा, बोहोरपट्टी, भांडीबाजार, दहीपूल या भागात मोहीम राबवत दुकानदारांनी रस्त्यावर मांडलेला माल जप्त केला.

ठळक मुद्देगुन्हे दाखल करण्यासंबंधीच्या नोटिसा पथकाची पाठ वळताच विक्रेते रस्त्यावर

नाशिक : महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने शुक्रवारी (दि.२९) रविवार कारंजा, बोहोरपट्टी, भांडीबाजार, दहीपूल या भागात मोहीम राबवत दुकानदारांनी रस्त्यावर मांडलेला माल जप्त केला. यावेळी पुन्हा अतिक्रमण केल्यास गुन्हे दाखल करण्यासंबंधीच्या नोटिसा परिसरातील सुमारे ५० दुकानदारांना बजावण्यात आल्याची माहिती पश्चिमचे विभागीय अधिकारी नितीन नेर यांनी दिली.महापालिकेमार्फत गेल्या दोन दिवसांपासून मेनरोड, भद्रकाली, महात्मा गांधीरोड या भागात व्यापाºयांनी आपल्या दुकानांसमोर केलेले अतिक्रमण हटविण्याची मोहीम राबविली जात आहे. मात्र, अतिक्रमण विभागाच्या पथकाची पाठ वळताच पुन्हा विक्रेते रस्त्यावर ठाण मांडून बसत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे अतिक्रमण विरोधी पथकाने मोहीम अधिक व्यापक करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार, शुक्रवारी रविवार कारंजा, बोहोरपट्टी, कापडबाजार, भांडीबाजार व दहीपूल याठिकाणी व्यापाºयांनी केलेले अतिक्रमण काढून घेण्याची कारवाई केली. दुकानासमोर लावण्यात आलेले गज, पाइप गॅसकटरच्या माध्यमातून कापून घेण्यात आले तर सुमारे २ ट्रक माल जप्त करण्यात आला. दुकानदारांनी पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांवर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासंबंधीच्या नोटिसाही महापालिकेने बजावल्या. परिसरातील आणखी व्यावसायिकांना नोटिसा बजावण्यात येणार असल्याची माहिती नितीन नेर यांनी दिली. या मोहिमेत मनपाच्या पूर्व विभागाच्या अधिकारी जयश्री सोनवणे यांच्यासह ४० कर्मचारी सहभागी झाले होते. काही ठिकाणी विक्रेत्यांनी पथकाला विरोध करण्याचा प्रयत्न केला परंतु पोलीस बंदोबस्त असल्याने त्यांची मात्रा चालली नाही.