देवळा : तालुक्यात आरोग्य, एकात्मिक बालविकास व शिक्षण विभागाच्या बेशिस्त कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करीत कामात कुचराई करणाºया आरोग्य विभागातील कर्मचाºयांना नोटीस काढून त्यांचे एक दिवसाचे वेतन कापण्याची कारवाई करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपकुमार मीणा यांनी देवळा येथे झालेल्या तालुक्यातील विविध योजना आढावा बैठकीत दिले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शीतल सांगळे उपस्थित होत्या.येथील नवीन प्रशासकीय कार्यालयात देवळा पंचायत समितीने देवळा तालुक्यातील विविध योजना आढावा बैठकीचे आयोजन केले होते. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष शीतल सांगळे होत्या. मुख्य कार्यकारी अधिकारी दीपकुमार मीणा, देवळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या तिन्ही गटाचे सदस्य धनश्री अहेर, नूतन अहेर व यशवंत सिरसाठ तसेच अति. मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल लांडगे, आरोग्य विभागाचे वाघचौरे, पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रतिभा संगमनेरे, ग्रामपंचायत विभागाचे राजेंद्र पाटील, प्रदीप चौधरी, हेमंत काळे, गटविकास अधिकारी महेश पाटील आदी उपस्थित होते. पंचायत समितीच्या सभापती केशरबाई अहिरे यांच्या हस्ते सांगळे यांचा सत्कार करण्यात आला. पंचायत समितीच्या सर्व विभागाच्या कामकाजाचा आढावा यावेळी घेण्यात येऊन योग्य त्या सूचना करण्यात आल्या. आरोग्य विभागाचे कुपोषित बालकांसंबंधी, एकात्मिक बालविकासचे पोषण आहारा-संबंधीचे काम असमाधानकारक असल्याचे निदर्शनास आल्यामुळे दीपकुमार मीणा यांनी संबंधित विभागाच्या अधिकाºयांना चांगलेच फैलावर घेतले.कुपोषित बालकांसंबंधी कामात कुचराई करणाºया आरोग्य विभागाच्या कर्मचाºयांना नोटीस काढून त्यांचे एक दिवसाचे वेतन कापून घेण्याचे आदेश त्यांनी दिले. तसेच पोषण आहारासंबंधी धान्य खराब झाल्यास संबंधित कर्मचाºयांकडून ते पैसे वसूल करण्याची सूचना देण्यात आली. शिक्षण विभागाच्या बेशिस्त कारभारावर त्यांनी ताशेरे ओढले. जि.प. सदस्य यशवंत सिरसाठ यावेळी पंचायत समितीचे शिक्षण, आरोग्य, ग्रामपंचायत, पाणीपुरवठा व स्वच्छता, समाजकल्याण, लघुपाटबंधारे, कृषी, एकात्मिक बालविकास, बांधकाम, पशुसंवर्धन, आदी सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
कामात दिरंगाई करणाºयांविरुद्ध कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2017 00:09 IST