शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

१९ अनधिकृत धार्मिक स्थळांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2017 00:42 IST

उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रहदारीला अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा चौथा दिवस शनिवारी (दि.११) शांततेत पार पडला. दिवसभरात पूर्व विभागातील १९ धार्मिक स्थळे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.

नाशिक : उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये महापालिकेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या रहदारीला अडथळा ठरणाºया अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याच्या मोहिमेचा चौथा दिवस शनिवारी (दि.११) शांततेत पार पडला. दिवसभरात पूर्व विभागातील १९ धार्मिक स्थळे पोलीस बंदोबस्तात हटविण्यात आली.  वाहतुकीला अडथळा ठरणाºया शहरातील विविध रस्त्यांवरील तसेच रस्त्यांच्या कडेला असलेले अनधिकृत धार्मिक स्थळे हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिल्यानंतर महापालिका प्रशासनाने बुधवार (दि.८)पासून आदेशाची अंमलबजावणी सुरू केली. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने दंगल नियंत्रण पथकासह राज्य राखीव दलाच्या तुकडीचा वाढीव बंदोबस्त या मोहिमेसाठी पुरविण्यात आला आहे. सहायक पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित पोलीस ठाणे हद्दीतील वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह पोलिसांचा फौजफाटा महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकासोबत संरक्षणासाठी देण्यात आलेला होता. मोहिमेला संभाजी चौक, उंटवाडी रस्त्यावरून सकाळी दहा वाजता प्रारंभ करण्यात आला. यानंतर अतिक्रमण निर्मूलन पथक मुंबई नाकामार्गे शिवाजीवाडी, भारतनगर परिसरात पोहचले. वडाळा-पाथर्डी रस्त्यावरील एका धार्मिक स्थळाचा अतिक्रमित बांधकाम हटविल्यानंतर शिवाजीवाडीसमोरील वडाळा रस्त्याच्या मध्यभागी असलेल्या धार्मिक स्थळावर कारवाई करण्यात आली. यानंतर वडाळारोडने पथक पखालरोडवर दाखल झाले. येथील एक लहान धार्मिक स्थळ हटविल्यानंतर पथक काठेगल्लीमार्गे द्वारकेवर पोहचले. दुपारी दोन वाजता द्वारका येथे पथक धडकल्यानंतर पुणे महामार्गावरील नाशिकरोडकडून द्वारकेकडे येणारी वाहतूक काठेगल्ली सिग्नलवरून डावीकडे वळविण्यात आली होती. दुपारी साडेचार वाजेपर्यंत या मार्गावरील वाहतूक पर्यायी मार्गाने सुरू होती. दरम्यान, द्वारके च्या वळणावर डाव्या बाजूला असलेले धार्मिक स्थळ हटविण्यात आले. यावेळी काही काळ गोंधळाची परिस्थिती झाली होती. काही धार्मिक संघटनांच्या पदाधिकाºयांनी घोषणा दिल्याने गोंधळात भर पडली; मात्र सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ वाहतूक शाखेचे सहायक आयुक्त अजय देवरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील नंदवाळकर यांनी संबंधितांना समज दिली. यानंतर विधिवत पूजा पूर्ण झाल्यानंतर धार्मिक स्थळावर पालिकेच्या पथकाकडून कारवाईला प्रारंभ करण्यात आला. दुपारी साडेतीन वाजेपासून कारवाई सुरू झाली. सुमारे दीड ते दोन तासापर्यंत या ठिकाणी काम सुरू होते. ‘त्या’ धार्मिक स्थळाला अवधी वडाळानाका परिसरातील महामार्गाला समांतर असलेल्या रस्त्यावरील एक धार्मिक स्थळ हटविताना धार्मिक परंपरेनुसार विधीकार्य करण्याची मागणी यावेळी जमलेल्या जमावाने केली असता महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन विभागाच्या पथकाने स्वयंस्फूर्तीने सदर धार्मिक स्थळ विधिवत धार्मिक पद्धतीने कार्य पूर्ण करून सोमवारी दुपारी १२ वाजेपर्यंत काढून घ्यावे, असे आदेश पालिकेने दिले आहे. दरम्यान, यावेळी काहीकाळ महापालिका अधिकारी व धार्मिक संस्थेच्या कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाल्याने गोंधळ निर्माण झाला होता. संध्याकाळी ७ वाजता पथक येथून माघारी फिरले. सर्वेक्षणाच्या यादीत सदर धार्मिक स्थळाचा उल्लेख नसल्याचा दावा यावेळी संबंधितांकडून करण्यात आला; मात्र हा दावा महापालिकेच्या अधिकाºयांनी फेटाळून लावला. थेट जेसीबीच्या पंजावर मजूर द्वारका येथील धार्मिक स्थळ हटविताना मनपाच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाला सूचना देणाºया संबंधित पालिका कर्मचाºयांनी मजुरांनाच थेट जेसीबीच्या पंजावर चढण्यास सांगितले. तीन मजूर पंजाला लटकले अन् जेसीबीचालकाने पंजा जमिनीपासून वर उचलण्यास सुरुवात केली; मात्र सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न उद्भवू शकतो अन् अपघात होऊ शकतो हे लक्षात घेऊन तत्काळ पोलिसांनी धाव घेऊन चालकास पंजा खाली करण्याचे आदेश दिले व अनर्थ टळला.   उंटवाडीरोडवरील संभाजी चौक, भारतनगर, शिवाजीवाडी, विनयनगर, हिरवेनगर, काठेगल्ली, द्वारका, कन्नमवार पूल, बजरंगवाडी, फेम सिग्नल, अशोकामार्ग या भागातील विविध धार्मिक स्थळे पालिकेने शनिवारी हटविली. दरम्यान, कन्नमवार पुलाजवळील धार्मिक स्थळ स्वयंस्फूर्तीने काढून घेण्यात आले.