शहरं
Join us  
Trending Stories
1
गोंधळात गोंधळ: ससूनमधील गैरप्रकाराच्या चौकशीसाठी SIT, मात्र अध्यक्षावरच आहेत भ्रष्टाचाराचे आरोप!
2
ताज हॉटेल अन् विमानतळ बॉम्बने उडवणार; मुंबई पोलिसांना आला धमकीचा फोन
3
'अब की बार...४०० पार' घोषणेचा निवडणुकीत फटका बसला; भुजबळांनी जाहीरपणे दिली कबुली
4
"4 जूनला आमचे सरकार येणार अन् 5 जुलैला तुमच्या खात्यात 8500 रुपये टाकणार"- राहुल गांधी
5
"आम्ही पाठिंबा दिला होता, त्यामुळे..."; निवडणूक संपताच महाविकास आघाडीत फूट?
6
विभव कुमार यांचे सर्व युक्तिवाद निष्फळ, स्वाती मालिवार मारहाण प्रकरणी जामीन अर्ज फेटाळला
7
‘‘हिट अँड रन’ प्रकरणात महायुतीतील सत्ताधारी आमदार- मंत्री आरोपींचे ‘गॉडफादर‘,’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
8
विधानसभेत भाजपा किती जागा लढवणार, मित्रपक्षांना काय देणार? भुजबळांच्या दाव्यानंतर फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
9
Fact Check: राहुल आणि सोनिया गांधींच्या सेल्फीमध्ये येशू ख्रिस्ताचा फोटो नाही
10
किमान आता तरी कोणती कारणं सांगू नका; वसीम अक्रमने भारतीय खेळाडूंची उडवली खिल्ली
11
विरोधक पुन्हा एकवटणार, 1 जून रोजी INDIA आघाडाची दिल्लीत बैठक, जाणून घ्या कारण...
12
Hardik Pandya नक्की कुठेय? टीम इंडियासोबत USA ला गेला नाही; मोठी अपडेट समोर
13
फोन जप्त करून राजीनामा घ्या; दमानियांचा हल्लाबोल: खुलासा करत अजित पवार म्हणाले...
14
आता ओडिशात मिळणार मोफत वीज, मुख्यमंत्री नवीन पटनायक यांची मोठी घोषणा
15
कर्नाटक सेक्स स्कँडलमधील मुख्य आरोपी भारतात येणार; ३१ मे रोजी SIT ला सामोरं जाणार
16
रायफलने डीजे ऑपरेटरच्या छातीत मारली गोळी; मद्यपानानंतर झालेल्या भांडणात तरुणाची हत्या
17
Tata Altroz ​​Racer चा टीझर रिलीज, पुढच्या महिन्यात होणार लाँच, किती असेल किंमत?
18
तुम्ही आंधळे आहात का? तुमच्यावर विश्वास नाही म्हणत कोर्टानं गुजरात सरकारला फटकारलं
19
"अडवाणी पाकिस्तानी आहेत, भारतात येऊन स्थायिक झाले", राबडी देवींचा भाजपावर निशाणा
20
अंबाती रायुडूला RCB चा माजी खेळाडू Live Show मध्ये 'Joker' म्हणाला, मयांतीने मुद्दा छेडला अन्... 

मका खरेदीला बारदानाचे ग्रहण !

By श्याम बागुल | Published: December 01, 2018 6:18 PM

गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते. ते टाळण्यासाठी यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन

ठळक मुद्देपाच हजार शेतकऱ्यांची नोंदणी : चार केंद्रे सुरू

नाशिक : जिल्ह्यात हमीभावात मका खरेदी केंद्रे सुरू करण्यात आली असून, यंदाही शेतकºयांना आॅनलाइन नोंदणी करण्याची सक्ती केल्याने जिल्ह्यातील ४९८३ शेतक-यांनी आपल्याकडील सुमारे एक लाख क्विंटल मक्याची नोंदणी केली आहे. परंतु खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी खरेदी-विक्री संघांकडे बारदानाची कमतरता भासू लागल्याने आजवर फक्त ३७ शेतक-यांचा मका खरेदी करावा लागला आहे.गेल्या वर्षी सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाल्यामुळे बंपर उत्पादन देणा-या मक्याच्या उत्पादनात यंदा निम्म्याने घट झाली आहे. गेल्या वर्षी सुमारे दीड लाख क्विंटल मक्याची खरेदी करण्यात येऊनही शेवटच्या टप्प्यात काही शेतक-यांना खरेदीपासून वंचित राहावे लागले होते. ते टाळण्यासाठी यंदा १ नोव्हेंबरपासून शेतक-यांना आॅनलाइन नोंदणीची सुविधा व दुसºया आठवड्यापासूनच मका खरेदी केंद्रे सुरू करण्याचा निर्णय पणन महामंडळाने घेतला. त्यानुसार जिल्ह्यात ३० नोव्हेंबरअखेर ४,९८३ शेतक-यांनी नोंदणी केली असून, ३१ डिसेंबरपर्यंत नोंदणीची मुदत देण्यात आली आहे. दिवाळीनंतर शेतकºयांनी मका काढणीला घेतल्यामुळे खुल्या बाजारातही व्यापाºयांनी मका खरेदीला सुरुवात केली असून, त्यासाठी १५०० ते १६०० रुपये क्विंटलमागे दर देण्यात आला आहे, तर केंद्र सरकारने हमीभावाने १७०० रुपये दर निश्चित केला आहे.जिल्ह्यात मका खरेदीसाठी सिन्नर, येवला, मालेगाव व चांदवड या चार खरेदी-विक्री केंद्रांवर खरेदी सुरू केली असून, आजवर ३७ शेतकºयांचा ९३० क्विंटल मका खरेदी करण्यात आला आहे. पुढच्या आठवड्यात सटाणा, देवळा, लासलगाव आदी ठिकाणी केंद्रे सुरू करण्याची तयारी जिल्हा मार्केट फेडरेशनने केली आहे. तथापि, खरेदी केलेला मका साठवणुकीसाठी यंदा शासकीय गुदामे उपलब्ध असली तरी, मका भरण्यासाठी बारदानाची कमतरता भासू लागली आहे. खरेदी केंद्रांकडे पडून असलेल्या बारदानामध्ये तूर्त उपलब्ध मका साठवणूक करून वेळ मारून नेली जात असताना खरेदी केंद्रावर आलेल्या शेतकºयांना बारदानाअभावी परत पाठविणे योग्य नसल्यामुळे काहीशा मंदगतीने खरेदी केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार पणन महामंडळाकडून संपूर्ण राज्यासाठी बारदानाची खरेदी केली जाते, परंतु अजुनही खरेदीची प्रक्रिया पूर्ण झालेली नसल्यामुळे बारदानाचा तुटवडा निर्माण झाला आहे. जिल्हा मार्केट फेडरेशनने या संदर्भात बारदानाची मागणी केली असून, येत्या दोन दिवसांत २० हजार बारदान उपलब्ध होतील, अशी माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी इंगळे यांनी दिली.

टॅग्स :agricultureशेतीNashikनाशिक