शहरं
Join us  
Trending Stories
1
जपानचे पंतप्रधान शिगेरू इशिबा राजीनामा देण्याच्या तयारीत! का घेतला मोठा निर्णय?
2
लाल समुद्रात इंटरनेटची केबल तुटली; भारत-पाकिस्तानसह आशियातील अनेक देशांना फटका
3
टिंडरवरच्या मैत्रिणीला भेटायला गेला अन् तरुणासोबत मोठा गेम झाला! पोस्ट लिहीत म्हणाला...
4
रात्री Wifi बंद करायला हवं का? ९९% लोकांना माहित नाहीत फायदे, समजल्यावर तुम्हीही...
5
रशियाने कीववर ड्रोन आणि क्षेपणास्त्रे डागली, कॅबिनेट इमारतीतून धूर निघाला; हल्ल्यात दोघांचा मृत्यू
6
"पुढच्या वर्षी सुनेला घेऊनच विसर्जनाला येणार...", लेकाच्या लग्नाला आदेश बांदेकरांचा ग्रीन सिग्नल
7
सोने खरेदीचा विचार करताय? थांबा! सोन्याने गाठला नवीन उच्चांक, आठवड्यात ३,९०० रुपयांची वाढ
8
पितृपक्ष संकष्ट चतुर्थी २०२५: मृत्यू पंचकाचे विघ्न दूर होणार, गणपती शुभ करणार; ५ गोष्टी करा!
9
गरिबीचं भीषण वास्तव! खाण्यासाठी पैसे नव्हते, जन्मदात्या आई-वडिलांनी मुलाला ५० हजारांना विकलं
10
पर्थमध्ये पारंपरिक उत्साहात साजरा झाला गणोशोत्सव; मराठी संस्कृतीचे जतन, एकरुपतेचे होते यथार्थ दर्शन
11
डोक्यावर मारला रॉड, चादरीत गुंडाळला मृतदेह अन्...; तिसऱ्या बायकोनं प्रियकरासोबत मिळून केलं कांड!
12
'अमेरिकेने आपल्यावर ५० % कर लादला, भारताने ७५ % लादावा', केजरीवालांचे केंद्राला आवाहन
13
एस्ट्रोनॉमर कंपनीच्या एक्स एचआर प्रमुख कॅबोट यांनी घटस्फोटसाठी अर्ज केला; सीईओ सोबत डान्सचा व्हिडीओ व्हायरल झाला होता
14
खग्रास चंद्रग्रहण २०२५: गर्भवती महिलांनी ग्रहण पाहणे अशुभ असते का? पाहा, नियम अन् मान्यता
15
हृतिक रोशनची ही हीरोईन वयाच्या ३९ व्या वर्षीच बनली होती आजी, एकेकाळी रंगली होती अफेअरची चर्चा
16
पितृपक्ष २०२५: अत्यंत प्रभावी ८ मंत्र, श्राद्ध विधी करताना म्हणा; पितरांच्या कृपेचे धनी व्हा!
17
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! दिवाळीपूर्वी वाढणार महागाई भत्ता, पगार-पेन्शनमध्ये किती वाढ होईल?
18
मृत्यू पंचकात पितृपक्ष २०२५: ‘या’ ७ तिथींना अधिक महत्त्व; पाहा, पितृ पंधरवड्याच्या मान्यता
19
११ वर्षाची मुलगी निघाली सहा महिन्याची गर्भवती, शेजाऱ्याकडूनच अनेकवेळा बलात्कार; जन्मताच बाळाचा मृत्यू
20
बीसीसीआयने मोडले कमाईचे रेकॉर्ड, गेल्या पाच वर्षांत केली एवढी कमाई, आकडा वाचून विस्फारतील डोळे

अन् फिर्यादीच निघाला आरोपी

By admin | Updated: November 12, 2016 01:45 IST

२४ तासांत गुन्हा उघड : पाच संशयित ताब्यात

बीड : विषारी द्रव प्राशन केलेल्या प्रेमीयुगुलावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना मुलीच्या नातेवाईकांनी कोयत्याने हल्ला केला. या हल्ल्यानंतर मुलीचा मृत्यू झाला होता. याप्रकरणात मुलीच्या भावासह दोन चुलत्यांना येथील प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश ए. एल. पानसरे यांनी शुक्रवारी दोषी ठरवत जन्मठेप व प्रत्येकी दहा हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. शहरातील धोंडीपुरा भागातील सुषमा काळवणे (वय २१) व दशरथ कुडके (वय २५) यांच्यामध्ये प्रेमप्रकरण सुरु होते. दोघेही उच्च शिक्षित असले तरी सुषमा हिच्या घरातून विवाहास विरोध होता. २३ डिसेंबर २०१४ रोजी सुषमाच्या घरातील सर्वजण तिच्यासाठी मुलगा पाहण्यास बाहेर गावी गेले होते. याच दिवशी सुषमा व तिचा प्रियकर दशरथ कुडके हे खंडेश्वरी परिसरात असलेल्या नाळवंडी नाका येथे गेले. आपला विवाह होणार नाही या नैराश्यातून दोघांनी विष प्राशन केले. याची माहिती दशरथ कुडके याचा मित्र धनंजय चव्हाण यास कळताच त्याने दोघांनाही शहरातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले. सुषमाच्या घरातील लोक परत बीडला आल्यानंतर हा प्रकार त्यांना कळताच संतप्त झालेला तिचा भाऊ सोनू उर्फ विठ्ठल काळवणे, चुलते बंडू काळवणे, बाबू काळवणे हे रुग्णालयात आले. बरोबर आणलेल्या कोयत्याने दोघांवर वार केले. यामध्ये दोघेही गंभीर जखमी झाले. २४ डिसेंबर २०१४ रोजी उपचार सुरु असताना सुषमाचा मृत्यू झाला तर दशरथ कुडके यास पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविले. नंतर तो वाचला.या प्रकरणी शहर ठाण्यात सोनू काळवणे, बंडू काळवणे, बाबू काळवणे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास तत्कालीन स.पो.नि. शेळके यांनी करून या प्रकरणी प्रमुख व जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणी सहायक सरकारी वकील मिलिंद वाघीरकर यांनी सरकारी पक्षाच्या वतीने बाजू मांडली. या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. (प्रतिनिधी)