शहरं
Join us  
Trending Stories
1
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
2
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
3
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
4
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
5
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
6
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
7
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले
8
पहिल्या डावात झिरो, तोच फायनलचा हिरो! मार्करम हा शतकातील असा पहिला 'शतकवीर' ज्यानं...
9
उल्हासनगरला पावसाने झोडपले, नाल्यावरील पूल कोसळला 
10
टेम्बा बावुमाच्या कॅप्टन्सीला तोड नाही; आतापर्यंत एक टेस्ट नाही हारला! ऑस्ट्रेलिया तोंड पाडून घरला
11
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
12
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
13
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
14
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
15
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
16
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
17
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
18
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
19
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
20
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?

तिकीट विकल्याचा आरोप; १० इच्छुकांचा बहिष्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 5, 2017 00:48 IST

आगामी नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी पुणे येथे शनिवारी ११ इच्छुक उमेदवारांच्या राज्य टीडीएफकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. संघटनेत योगदान दिलेल्या व चळवळीत काम करणाºया शिक्षकाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह १० इच्छुकांनी धरला. परंतु केवळ आर्थिक संपन्नता हा निकष लावून एकाच उमेदवारला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न झाला, व टीडीएफच्या पदाधिकाºयांनी तिकीट विकल्याचा आरोप करीत १० इच्छुकांनी मुलाखतींवर बहिष्कार टाकला.

येवला : आगामी नाशिक विभाग शिक्षक आमदार निवडणुकीसाठी पुणे येथे शनिवारी ११ इच्छुक उमेदवारांच्या राज्य टीडीएफकडून मुलाखती आयोजित करण्यात आल्या होत्या. संघटनेत योगदान दिलेल्या व चळवळीत काम करणाºया शिक्षकाला उमेदवारी द्यावी, असा आग्रह १० इच्छुकांनी धरला. परंतु केवळ आर्थिक संपन्नता हा निकष लावून एकाच उमेदवारला प्रोजेक्ट करण्याचा प्रयत्न झाला, व टीडीएफच्या पदाधिकाºयांनी तिकीट विकल्याचा आरोप करीत १० इच्छुकांनी मुलाखतींवर बहिष्कार टाकला. १० इच्छुक उमेदवारांनी बहिष्काराचे रीतसर पत्र टीडीएफ अध्यक्ष राज्य विजय बहाळकर यांना दिले. दरम्यान याच ठिकाणी निषेधाची सभा घेण्यात येऊन, राज्य टीडीएफचे कार्याध्यक्ष, फिरोज बादशहा यांच्या नेतृत्वाखाली या १० पैकी एकाला उमेदवारी देऊन त्याचे काम सर्वांनी करावे, असे एकमताने ठरविण्यात आले. उपस्थित इच्छुक उमेदवार आणि त्यांचे समर्थक यांनी टीडीएफ पदाधिकाºयांच्या निषेधाच्या घोषणा देत तिकीट विकल्याचा जाहीर आरोप करत, पदाधिकाºयांचे धिंडवडे काढले. टीडीएफच्या उमेदवारी वाटपाच्या इतिहासात पहिल्यांदा खास मुंबई येथून बाउन्सर बोलविण्यात आले होते.  नाशिक विभाग शिक्षक मतदार संघ निवडणुकीत टीडीएफ संघटनेच्या वतीने टीडीएफ संघटनेत कार्यरत असलेल्या शिक्षक कार्यकर्त्यांना डावलून टीडीएफ संघटनेशी काहीही संबंध नसलेल्या उमेदवारास आर्थिक देवाणघेवाणीतून तिकीट देण्याचा घाट घातल्याचा स्पष्ट आरोप १० इच्छुकांनी केला. नाशिक विभाग शिक्षक मतदार संघातील टीडीएफ संघटनेशी निगडित अहमदनगर, नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबारमधील क्रि याशील इच्छुक दहा उमेदवारांनी निवडणूक मुलाखतीवर बहिष्कार घालून १० उमेदवारांपैकी कोणीही एकाने उमेदवारी करून इतरांनी पाठिंबा देण्याचा घेतला आहे.  याप्रसंगी अहमदनगर जिल्हा माध्यमिक शिक्षक संघटनेचे सचिव व इच्छुक उमेदवार आप्पासाहेब शिंदे म्हणाले टीडीएफच्या इतिहासातील काळा दिवस आज ठरला. आम्हा २५ व ३० वर्षे टीडीएफ शिक्षक संघटनेसाठी हयात घालवणाºया प्रामाणिक लोकांना टाळून ४ महिन्यांपूर्वी संघटनेशी काही संबंध नसताना फक्त उमेदवारीसाठी सलगी नामधारी शिक्षकास उमेदवारी देण्याचा घाट घातला आहे. याविरोधात आम्ही नाशिक शिक्षक मतदार संघातील इच्छुक १० उमेदवारांपैकी कोणीही एका उमेदवारास उमेदवारी देऊन विजयी करणार आहोत व विकाऊ पदाधिकाºयांना धडा शिकवून उमेदवार विजयी करण्याचा निश्चय केला. याप्रसंगी भाडोत्री बाउन्सरचा वापर करून इच्छुक उमेदवारांना बळजबरी व दमदाटी करण्याचा व लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रयत्न झाला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नेते सुभाष कुलकर्णी, चांगदेव कडू, महाराष्ट्र राज्य शिक्षक फेडरेशन उपाध्यक्ष नंदकुमार शितोळे, प्रशांत होन, संतोष ठाणगे, सुनील दानवे, मंगेश काळे, विजय थोरात, उद्धवराव सोनवणे, महेंद्र हिंगे, अर्जुन भुजबळ, जनार्दन पटारे, भाऊसाहेब जिवडे, सुदाम दळवी, हरिश्चंद्र नलगे, सुधीर काळे यांसह नाशिक शिक्षक मतदार संघातील पाच जिल्ह्यातील शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते. नासिक विभाग शिक्षक आमदारकीच्या निवडणुकीसाठी शाळीग्राम भेरूड, आप्पासाहेब शिंदे, राजेंद्र लांडे ,भाऊसाहेब कचरे, निशांत रंधे , आर डी निकम , विठ्ठल पानसरे , एम एस लगड, एस बी देशमुख, ए.एस.लाठर आदींनी उमेदवार मुलाखतीवर बहीष्कार टाकला.व एकित्रत पणे निवेदन दिले. याप्रसंगी इच्छुक उमेदवारांनी उमेदवार निवड प्रक्रि येवर बिहष्कार टाकला . यापप्रसंगी टिडीएफचे राज्यउपाध्यक्ष चांगदेवराव कडु यांचे अध्यक्षतेखाली निषेध सभा घेण्यात आली.