शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस गोव्यातून अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 01:28 IST

चांदवड बसस्थानक परिसरात भरदिवसा खून करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने गोवा राज्यातून अटक केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात चांदवड बसस्थानक परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

चांदवड : चांदवड बसस्थानक परिसरात भरदिवसा खून करणाऱ्या संशयितास स्थानिक गुन्हे शाखेने गोवा राज्यातून अटक केली आहे. गेल्या एप्रिल महिन्यात चांदवड बसस्थानक परिसरात एका २५ वर्षीय युवकाचा खून झाला होता. याप्रकरणी चांदवड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.  गेल्या महिन्यात १७ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास चांदवड शहरातील रहिवासी इम्रान फारूख शेख यांचा मुलगा सद्दाम शेख (२५) याला त्याचा आडगाव टप्पा येथील मित्रप्रेम निवृत्ती पवार याने अज्ञात कारणावरून झालेल्या वादात तिक्ष्ण हत्याराने छातीवर व पोटावर वार करून गंभीर जखमी करत जिवे  ठार मारले होते.घटनेनंतर गुन्ह्णातील संशयित प्रेम पवार फरार होता. नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह व मालेगावचे अपर पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या सूचनेनुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुन्ह्णाचा तपास सुरू करीत संशयिताच्या नातेवाईक, मित्रांवर करडी नजर ठेवली होती.सिनेस्टाइलने पाठलागसंशयित गोव्यात असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी गोव्यातील आरपोरा भागात एका गादी भांडाराच्या दुकानावर कामास असलेल्या संशयित प्रेम पवार यास पकडण्यासाठी २२ मे २०१९ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास सापळा रचला होता. परंतु पोलीस आल्याची चाहूल लागताच त्याने तिथून पळ काढल्याने सिनेस्टाइलने पाठलाग करत पोलिसांनी पवारच्या मुसक्या आवळल्या. दरम्यान, संशयितास विश्वासात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुलीदिली आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसgoaगोवा