शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

सिने पाठलाग करत आरोपीला केले जेरबंद....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 16:56 IST

पिंपळगाव बसवंत : शहरातील पवन सूत नगर परिसरातील एक लाख रु पयांची दिवसाढवळ्या धाडसी चोरी करणाऱ्या सराईत कुख्यात चोरट्याचा सिनेपाठलाग करत अटक करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना काही तासातच यश आले आहे.

ठळक मुद्देपिंपळगाव पोलिसांनी आवळल्या काही तासातच चोराच्या मुसक्या

पिंपळगाव बसवंत : शहरातील पवन सूत नगर परिसरातील एक लाख रु पयांची दिवसाढवळ्या धाडसी चोरी करणाऱ्या सराईत कुख्यात चोरट्याचा सिनेपाठलाग करत अटक करण्यात पिंपळगाव बसवंत पोलिसांना काही तासातच यश आले आहे.सचिन साहेबराव रायते (२६) रा. खडकमाळेगाव असे आरोपीचे नाव आहे. आत्तापर्यंत ३० ते ३५ चोरी व दरोड्याचे गुन्हे दाखल असलेल्या या चोरट्याच्या मुसक्या आवळत त्याच्याकडून ७५ हजार ५०० रु हस्तगत करण्यात आले आहे.कोरोनामुळे करण्यात आलेले लॉक डाऊन आता हळूहळू शिथील झाले असले तरी अजूनही काही लोक घराबाहेर निघणे टाळतात त्यामुळे या काळात चोरीच्या प्रमाणात देखील घट झाली आहे. मात्र पिंपळगाव बसवंत परिसरातील पवन सूत नगर येथील गवंडी काम करणाºया कुटूंबातील पती गावात तर पत्नी नदीवर धुणे धुण्यासाठी गेल्याचा फायदा घेत चोरट्याने एक लाख रु पयांवर डल्ला मारत रोकड चोरून नेली होती. लासलगाव पोलीस ठाण्याचे हवालदार महाजन यांनी दिलेल्या गुप्त माहितीने पिंपळगाव ठाण्याचे पोलीस सहाय्यक निरीक्षक कुणाल सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पंडित वाघ, नितीन जाधव, योगेश बुरंगुले, रवी चिने, रवी झालटे, हवालदार नितीन निंबेकर आदींच्या प्रयत्नाने आरोपीला काहि तासातच बेड्या ठोकत गजाआड केले व त्याकडून ७५ हजार ५०० रु हस्तगत करण्यात आले आहे.जिल्ह्यात चोरी करणारा कुख्यात आरोपी ताब्यात ...नाशिक जिल्ह्यात ठिकाणी चोरी करणारा सचिन साहेबराव रायते अटक करण्यात पोलिसांसमोर मोठे आव्हान होते पण या चोरट्याने पिंपळगाव शहर परिसरात दिवसाढवळ्या लाख रु पये चोरल्यावर लासलगाव येथील पोलिसांच्या गुप्त माहितीने आरोपीच्या राहत्या घरी पोलिसांनी छापा मारला, मात्र तो तिथून पळून जाण्यास यशस्वी झाला. पण पोलिसांनी सिनेस्टाईल पाठलाग करून अखेर त्याला पकडले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणे