शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कारखानदार एफआरपीनुसार उसाला भाव देणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2017 00:30 IST

नाशिक : साखरेचे भाव पडल्यामुळे तसेच कारखान्यांसमोर अडचणी असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने राज्य सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणेच उसाला भाव देण्यास तयार आहेत, असे बुधवारी (दि. २९) जिल्ह्यात सुरू असलेल्या चारही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले.

ठळक मुद्देकारखानदार एफआरपीनुसार उसाला भाव देणारनाशिक : जिल्ह्यात सुरू असलेल्या चारही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले.

नाशिक : साखरेचे भाव पडल्यामुळे तसेच कारखान्यांसमोर अडचणी असल्यामुळे नाशिक जिल्ह्यातील साखर कारखाने राज्य सरकारने ठरवून दिलेल्या एफआरपीप्रमाणेच उसाला भाव देण्यास तयार आहेत, असे बुधवारी (दि. २९) जिल्ह्यात सुरू असलेल्या चारही कारखान्यांच्या प्रतिनिधींनी शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींना सांगितले. तसेच कारखान्यांच्या प्रतिनिधींनी ऊस गाळपानंतर सरकारने ठरवून दिलेल्या ७०:३० या सूत्राप्रमाणे भाव देण्याचीही तयारी दर्शविली. स्वाभिमानी शेतकरी संघटनेनेही याबाबत सहमती दर्शविल्यामुळे ऊस भावाबाबतचे शेतकरी संघटनेचे आंदोलन टळल्याची चर्चा आहे.जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅँकेच्या जुन्या मुंबई-आग्रा मार्गावरील सभागृहात बुधवारी साखर संघाच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीस कादवा साखर कारखान्याचे अध्यक्ष श्रीराम शेटे, द्वारकाधीशचे अध्यक्ष शंकरराव सावंत, वसाकाचे प्रतिनिधी अण्णा पाटील, केजीएसचे प्रतिनिधीतसेच शेतकरी संघटनेचे गोविंद पगार, दीपक पगार, विशेष लेखापरीक्षक देशमुख, जिल्हा उपनिबंधक नीळकंठ करे उपस्थित होते. द्वारकाधीशचे अध्यक्ष शंकरराव सावंत यांनी, आम्ही (पान ५ वर)एफआरपीपेक्षा अधिक भावाची घोषणा केली असून, पहिली उचल २४०० रु पये, तसेच दिवाळीत १०० रु पये व सरकारच्या एफआरपीप्रमाणे भाव देण्याची तयारी असल्याचे तसेच यापेक्षा अधिक भाव दिल्यास सहकारी साखर कारखानदारी बुडविल्याचा आरोप घेण्याची तयारी नसल्याचेही त्यांनी सांगितले. केजीएसच्या प्रतिनिधींनी द्वारकाधीशप्रमाणेच भाव देण्याची तयारी दर्शविली. वसाकाच्या प्रतिनिधींनी द्वारकाधीश कारखान्याप्रमाणेच भाव देण्याचे आमचे धोरण असल्याचे स्पष्ट केले. शेतकरी संघटनेच्या प्रतिनिधींनी २६०० रु पये पहिली उचल देण्याची मागणी केली; परंतु कारखान्यांच्या प्रतिनिधींनी हे शक्य नसल्याचे सांगून त्यांची मागणी टाळली.श्रीराम शेटे यांनी साखर कारखानदारी कशी तोट्यात आहे याबाबत मांडणी केली. अशा परिस्थितीत कादवा एफआरपीप्रमाणे २२८५ भाव देण्यास तयार आहे. त्यानंतर ७०:३० या सूत्राप्रमाणे जी रक्कम येईल तीही दिली जाईल, असे स्पष्ट केले.