Accidents in tempo of devotees returning from Saptashringi fort; 4 killed | सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; 4 ठार
सप्तशृंगी गडावरून परतणाऱ्या भाविकांच्या टेम्पोला अपघात; 4 ठार

नाशिक : सप्तशृंगी गड येथे देवीचा नवसपूर्ती करून परतणाऱ्या भाविकांच्या आयशर गाडीला दिंडोरी तालुक्यातील वणी नजीकच्या कृष्णगावाजवळ अपघात होऊन चार भाविक ठार तर 20 ते 25 भाविक जखमी झाल्याची घटना घडली आहे. सोमवारी (दि.20) मध्यरात्री 12.30 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात घडला.


या अपघातात ठार झालेले चारही युवक असून ते 23 ते 30 वयोगटातील आहेत. रविवारी काही भाविक सप्तशृंगी गड येथे नवसपूर्ती फेडण्यासाठी गेले होते तेथून रात्री उशिरा नाशिकला परतत असताना वणी कृष्णगाव नजीक आयशर गाडीचे ब्रेक फेल झाल्याने चालकाने गाडी रस्त्यात असलेल्या गतिरोधकाजवळ थांबविली त्यावेळी काही भाविक गाडीतून उतरत असतांना पाठीमागून भरघाव वेगाने आलेल्या मालट्रकने धडक दिली या धडकेने चार जण जागीच ठार झाले तर इतर वीस ते पंचवीस जण जखमी झाले आहेत जखमींमध्ये पुरुष महिला तसेच लहान मुलांचा समावेश आहे.


या अपघातात ठार झालेल्या चौघांपैकी तिघे युवक हे पंचवटीतील पेठरोड येथील असल्याचे पोलिसांनी सांगितले. सागर अशोक ठाकूर (23), कुणाल कैलास ठाकूर (25), गणेश भगवतीप्रसाद ठाकुर (30), व त्र्यंबकेश्वर येथील आशिष माणिक ठाकूर (30) यांचा समावेश आहे. अपघातातील सर्व जखमींना वणी येथील ग्रामीण रुग्णालयात औषधोपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.


Web Title: Accidents in tempo of devotees returning from Saptashringi fort; 4 killed
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.