शहरं
Join us  
Trending Stories
1
यंदा जूनमध्येच 'अलमट्टी' ६१ टक्के भरले; कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
2
Raj Thackeray : 'दोन्ही ठाकरे एकत्र न आल्यास मराठी माणूस हताश होईल'; मनसे नेत्याचं मोठं विधान
3
संसाराची स्वप्न रंगवून पतीच्या घरी आली अन्...; लग्नाच्या अवघ्या दोन महिन्यात नवविवाहितेने उचलले टोकाचे पाऊल
4
बी २ बॉम्बर बनविणारा भारतीय इंजिनिअर होता, मती फिरली आणि चीनला गेला...
5
अरबी समुद्र, बंगालच्या उपसागराबाबत WMO चा भयानक रिपोर्ट; भारताच्या किनारपट्टीवरील शहरांना धोका
6
Turmeric Glow Trend: हळद ट्रेंड फॉलो कराल तर भयंकर संकट ओढावून घ्याल; ज्योतिषांचा अनोखा दावा!
7
'ही' कंपनी दिवाळखोर होण्यापासून वाचवणार सरकार! गुंतवणूकदारांच्या शेअरवर उड्या, ₹७ आहे किंमत
8
विमान प्रवास स्वस्त होणार! इंधन भरण्याचा त्रास संपणार, पहिल्यांदाच 'या' तंत्रज्ञानाचा वापर करुन विमान उड्डाण करणार
9
IND vs ENG: ऋषभ पंतची दोन डावात दोन शतकं, पण ICC ने केली कारवाई, कारण काय?
10
इराणच्या हल्ल्यात प्रचंड वित्तहानी, आयरन डोमच्या मर्यादा उघड, युद्धातून इस्राइलला मिळाले हे पाच धडे 
11
Raigad Boat Capsizes: रायगडमध्ये सावित्री नदीत बोट उलटली; काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडीओ समोर!
12
कमी व्याजदरावर होम लोन घ्यायचंय? 'या' सरकारी बँका ठरू शकतात बेस्ट; ७.५०% पेक्षाही कमी आहेत दर 
13
ड्रॅगनची वळवळ; पँगाँग सरोवराजवळ चीन नेमकं करतोय काय? सॅटेलाईट फोटोंमधून झाली पोलखोल  
14
Raipur Crime: रायपूरमध्ये 'नीळ्या ड्रम'सारखी घटना, सुटकेसमध्ये सिमेंट भरुन गोठवला तरुणाचा मृतदेह
15
'ऑपरेशन सिंदूर'ची माहिती देण्यासाठी पाकिस्तानने पैसे दिले'; लष्करातील गद्दार जवानाने उघड केले गुपित, बँके खात्यांची चौकशी सुरू
16
खासगी कंपन्यांना मिळणार वीजपुरवठ्याचा परवाना, अदानीचा ठाणे, नवी मुंबईवर दावा
17
Zerodha च्या कामथ बंधूंनी 'या' कंपनीचे २५० कोटींचे शेअर्स खरेदी केले; मार्केटमध्ये उतरण्यापूर्वी खेळला मोठा डाव 
18
"हिंदी भाषा काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत बोलली गेलीच पाहिजे, केंद्राने..."; अबू आझमींकडून हिंदीची वकिली
19
'ट्रॅजेडी क्वीन'वर येणार सिनेमा, 'या' अभिनेत्रीला ऑफर झाली मीना कुमारींची भूमिका
20
पहलगामच्या हल्ल्यात ३ नव्हे ४ दहशतवादी होते सामील; चौथा काय करत होता? ऐकून येईल चीड!

आरसेविरहित दुचाकींमुळे रस्त्यांवर अपघात

By admin | Updated: May 17, 2016 22:31 IST

जीवघेणी फॅशन : दुचाकीचा ‘शो’ जात असल्याचा अजब निष्कर्ष

नाशिक : शहरात मागील काही दिवसांपासून तरुणांची अजब फॅशन बघावयास मिळत आहे. कंपनीकडून दुचाकींना दिले जाणारे आरसे घरी काढून ठेवत आरसेविरहित दुचाकी रस्त्यावरून मिरवित अपघातांना तरुणवर्ग निमंत्रण देत आहे; मात्र याकडे शहर वाहतूक शाखेचे दुर्लक्ष होत आहे. आरसा हे वाहनचालकाचे पाठीमागील डोळे आहे, असे म्हटले जाते; मात्र याकडे तरुणाई फारसे गांभीर्याने घेत नाही. दुचाकीसोबत सर्वच कंपन्यांकडून ग्राहकांना मोफत आरसे दिले जातात. अ‍ॅक्सेसरीजमधून आरसे वगळण्यात आले आहे. बहुदा आरसे फुकटात मिळतात म्हणून तर त्याचे महत्त्व काही ‘हौशी’ तरुणांना लक्षात येत नसावे; मात्र आरसे नसल्याने उजवीकडे-डावीकडे वळताना अडचण तर निर्माण होतेच; पण रस्त्यावर सरळपणे दुचाकी चालविताना पाठीमागून येणाऱ्या वाहनांचा अंदाज येत नाही. मागील वाहन कोणत्या बाजूने व किती वेगाने येत आहे याचा कुठलाही अंदाज बांधणे आरसे नसलेल्या दुचाकी चालविणाऱ्या चालकाला अवघड होते. परिणामी मागून येणारे वाहन जर ओव्हरटेक करण्याचा प्रयत्नात असेल तर आरसे नसल्यामुळे त्या दुचाकीस्वाराच्या लक्षात येत नाही व तो ज्या ट्रॅकवरून चालला आहे तो ट्रॅक अचानकपणे बदलून ओव्हरटेकच्या प्रयत्नात असलेल्या वाहनाच्या समोरदेखील अनवधानाने येऊन अपघाताला निमंत्रण मिळते. तसेच वळण घेतानाही मागील बाजूने येणारे दुसरे वाहन किती अंतरावर आहे किंवा किती वेगाने येत आहे याचा कुठलाही अंदाज बांधता येत नाही अन् अपघात घडतो. (प्रतिनिधी)