शहरं
Join us  
Trending Stories
1
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
2
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
3
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
4
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
5
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
6
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
7
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
8
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
11
भांडूपमधील प्रकरण जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल
12
३० जूनला PPF, SSY सारख्या योजनांचे व्याजदर कमी होणार? सरकार मोठा निर्णय घेण्याची शक्यता, पाहा डिटेल्स
13
Vaijapur Crime: वैजापुरात महिला कीर्तनकाराची आश्रमातच दगडाने ठेचून हत्या, छ. संभाजीनगरात खळबळ!
14
Astro Tips: कुंडलीत 'ही' ग्रहस्थिती दर्शवते जोडीदाराचे विवाहबाह्य संबंध; वाढतो जीवाला धोका!
15
"फडणवीसांना खूपच धूर्त म्हणावं लागेल, प्रत्येक अधिवेशनाआधी ते एक फासा फेकतात आणि...", अंजली दमानियांचं सूचक ट्विट
16
'ही' महारत्न कंपनी देणार ३००% चा डिविडेंड; ५ वर्षांत शेअरमध्ये ११८४ टक्क्यांची तेजी, तुमच्याकडे आहे का?
17
‘किंग बिबी’ला जग एवढं का घाबरतं? त्यांनी इराणलाही शिंगावर घेतलं
18
कोण आहे शेफालीचा पती? ५ वर्षांतच मोडलेला पहिला संसार, मग पराग त्यागीच्या प्रेमात पडली अन्...
19
"माझा मुलगा सरन्यायाधीश होईल, पण ते पाहायला मी नसेल"; वडिलांची आठवण येताच भावुक झाले CJI गवई
20
Local Train Mega Block: रविवारी मुंबईत फिरण्याचा प्लॅन; मग मेगाब्लॉक अपडेट जाणून घ्या

राहुड घाटात अपघात; धुळ्याचे तीन ठार

By admin | Updated: December 27, 2016 01:09 IST

पहाटेची घटना : पाच जण गंभीर जखमी; इनोव्हा चालकाविरोधात गुन्हा

चांदवड : मुंबई-आग्रा रोडवर राहुड शिवारात आज पहाटे ३.३० वाजेच्या सुमारास इनोव्हाने छोटा हत्तीस पाठीमागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात धुळ्याचे तीन जण जागीच ठार, तर पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. मुंबई-आग्रा रोडवर राहुड घाटात पवार वस्तीजवळ चांदवडकडून मालेगावकडे जाणारी गोल्डन रंगाची इनोव्हा (क्रमांक एमएच ०४ - ईएच ४५६७ ही भरधाव वेगाने चालवून रस्त्यावरु न पुढे जात असलेला टाटा छोटा हत्ती (क्र. एमएच १८-एए ५१७२ हिस मागुन घडक दिल्याने छोटा हत्तीमधील नाशिककडून केंटरींगचा व्यवसाय आटोपुन धुळे येथे जाणारे शांतीशरण राजाराम वर्मा (४७) , बबीता सुकलाल पाथरे (४५) हे जागीच ठार झाले. निर्मलाबाई प्रकाश मिस्तरी (४०) यांना रुग्णालयात दाखल केले असता त्यांना मृत घोषित करण्यात आले. छोटा हत्तीमधील विमल छगन अंकुश (३५), सुरेखा सुरेश बागुल (२५) , संगीता गजानन चौधरी ( ४०), वर्षा श्याम बागुल (२५) , लक्ष्मीबाई लहु सोनवणे ( ५४) सर्व रा.धुळे गंभीर जखमी झाले. इनोव्हा चालक सचिन शिवाजी मलीक रा. कल्याण यांच्याविरोधात अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक अनंत मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती करीत आहेत. (वार्ताहर) वृत्त समजताच चांदवडचे पोलीस निरीक्षक अनंत मोहीते , सहाय्यक पोलीस निरीक्षक जितेंद्र भारती व पोलीस कर्मचारी घटनास्थळी गेले त्यांना सोमा टोलवेज कंपनीच्या ग्रस्ती व रुग्णवाहीका कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने अपघात ग्रस्त दोन्ही वाहने पलटी झाली होती त्यांना बाजुला काढले व रस्त्यावरील वाहतुक सुरळीत केली जखमी व मृतांना चांदवड उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.