शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

अपघातग्रस्त युवकाने रुग्णवाहिकेतून येऊन केले मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2019 01:33 IST

लोकसभा निवडणुकीसाठी सिडको व अंबड भागात मोठ्या प्रमाणात मतदारांंनी मतदानाचा हक्क बजाविला, यात अपघात झालेले तसेच आजारामुळे दवाखान्यात दाखल असलेल्यांनी मतदान करण्याबरोबरच कामटवाडे येथील मनपा शाळेत शैलैश सुभाष शिरोडे यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला.

सिडको : लोकसभा निवडणुकीसाठी सिडको व अंबड भागात मोठ्या प्रमाणात मतदारांंनी मतदानाचा हक्क बजाविला, यात अपघात झालेले तसेच आजारामुळे दवाखान्यात दाखल असलेल्यांनी मतदान करण्याबरोबरच कामटवाडे येथील मनपा शाळेत शैलैश सुभाष शिरोडे यांनी रुग्णवाहिकेतून येत मतदानाचा हक्क बजावला.सिडको भागात सकाळपासूनच मतदानासाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या. दुपारी उन्हामुळे काही प्रमाणात कमी झालेली गर्दी ही सायंकाळच्या सुमारास पुन्हा दिसून आली. कामटवाडे येथील रहिवासी शैलेश सुभाष शिरोडे यांचा दोन दिवसांपूर्वी अपघात झाला असल्याने ते खासगी रुग्णालयात उपचार घेत होते. सोमवारी मतदान असल्याने त्यांनी रुग्णालयात असतानाही मतदान करण्याची इच्छा व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते आबा पवार, भूषण सोनजे, किरण पारकर, कमलेश खैरणार यांनी त्रिमूर्ती हॉस्पिटलच्या वतीने मोफत रुग्णवाहिकेची सोय झाल्याने शिरोडे यांना कामटवाडे येथील शाळेत रुग्णवाहिकेमध्ये नेत त्यांनी मतदानाचा हक्कबजावला. तसेच सिडकोतील दत्तचौक भागातील ज्येष्ठ नागरिक तुकाराम वाघ (८५) यांना चालणेही मुश्कील असल्याने त्यांना स्वप्नील गामणे व स्वप्नील चिंचोरे या युवकांनी वाघ यांना खुर्चीच्या सहाय्याने  मोरवाडी येथील मतदान केंद्रापर्यंत नेल्याने त्यांनी मतदानाचा हक्क बजावला. नाशिक म्हसरूळ येथील रहिवासी प्रमिला प्रकाश चौरे यांचा अपघात झालेला असून, अपघातात पाय फ्रॅक्चर झाला आहे.  परंतु त्यांनीही सिडको उंटवाडी  येथील माध्यमिक विद्यालयात रुग्णवाहिकेमध्ये येत मतदानाचा हक्क बजाविला.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकnashik-pcनाशिक