ग्राउंड रिपोर्ट
घोटी : वाहतुकीच्या व वाहतूक वर्दळीच्या दृष्टीने महत्त्वाचा महामार्ग म्हणून ओळखला जाणाऱ्या घोटी-सिन्नर महामार्गावर सध्या अपघातांच्या वाढत्या घटना लक्षात घेता यंत्रणा व प्रवाशांसाठी ही चिंतेची बाब आहे. गेल्या चार महिन्यांत या मार्गावर घोटी-साकूर फाटादरम्यान अनेक लहान-मोठे अपघात झाले असून अपघातांची ही शृंखला अद्यापही सुरूच आहे. त्यामुळे घोटी-सिन्नर महामार्ग हा अपघात मार्ग ठरू लागला आहे.
दरम्यान अपघातांची वाढती संख्या, बांधकाम विभागाची हलगर्जीपणा, अपघात रोखण्यासाठी महामार्गावर करावयाच्या उपाययोजना तसेच अपघाताला कारणीभूत ठरणाऱ्या बाबींचा विचार करून बांधकाम विभागाने अपघातग्रस्त ठिकाणांवर सुधारात्मक उपाययोजना केल्यास महामार्गावरील अपघात रोखता येऊ शकतात. अनेक प्रवासी , वाहनचालकांचे जीव वाचवता येतील. अपघातग्रस्त ठिकाणी सुधारात्मक उपाययोजना करणे, ठिकठिकाणी रस्ता सुरक्षाबाबत फलके लावणे, वळण, धोकादायक ठिकाणे व अपघातग्रस्त ठिकाणी सूचनाफलक लावणे उताराच्या व वळणाच्या ठिकाणी वाहनांचा वेग नियंत्रित करण्यासाठी उपाययोजना करणे, साईडपट्ट्या मजबूत करणे, वळणाच्या ठिकाणी महामार्गाच्या बाजूला वाढलेले गवत काढणे अशा उपाययोजना केल्यास अपघात रोखणे शक्य आहे.
----------------------------
हे आहेत अपघाती क्षेत्र
घोटी-सिन्नर महामार्गावर देवळे - उंबरकोन फाटा, धामणी शिवार वळण, तातळेवाडी शिवार, धामणगाव -एसएमबीटी परिसर व जागीच वळण व उताराचे टप्पे.
---------------------------
घोटी-सिन्नर महामार्गावर गेल्या तीन महिन्यांत अनेक अपघात होऊन अनेकांना आपले प्राण गमवावे लागले, तर बहुतांश नागरिकांना कायमचे अपंगत्व आले. याच आठवड्यात बेलगाव तऱ्हाळे परिसरात कार अपघातात एका लहान मुलासह तिघांना जीव गमवावा लागला, तर सहा प्रवाशांना अपंगत्व आले. आठ दिवसांपूर्वीच एका बसलाही अपघात झाला. गेल्याच महिन्यात देवळे गावाजवळ दोन मोटारसायकलींचा अपघात होऊन दोन घटनेत दोघा युवकांचा बळी गेला तर चार महिन्यांपूर्वी समोरून येणाऱ्या कारने धडक दिल्याने एसएमबीटीच्या दोन विद्यार्थ्यांचा हकनाक बळी गेला. चार महिन्यांत याव्यतिरिक्त विविध ठिकाणी अपघात झाले.
-------------------------------------
घोटी-सिन्नर-शिर्डी हा राज्यातील महत्त्वाचा रस्ता असून, महामार्ग म्हणून दर्जा मिळाला आहे. असे असले तरी या महामार्गावर वर्षभरातच नव्हे तर कायमच लहान-मोठे अपघात घडले. घोटी - नाशिक- सिन्नर या ट्रँगलमध्ये याच महामार्गावर जास्त अपघात होतात. त्यामुळे बांधकाम विभागाने वेळीच दक्षता घेऊन अपघाताच्या ठिकाणी अपघात रोखण्यासाठी तत्काळ उपाययोजना कराव्यात,सूचनाफलक लावावेत, साइडपट्ट्या मजबूत कराव्यात.
पांडुरंग वारुंगसे, माजी उपसभापती, पंचायत समिती, इगतपुरी
-----------------------------------------
270821\img-20210820-wa0038.jpg
अपघात ग्रस्त गाडी