वाडीवऱ्हे/गोंदेदुमाला : कोरोना लसीकरण करून परतत असणाऱ्या वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शासकीय वाहनाला पाडळी देशमुखजवळ अपघात झाला आहे. मुंबईकडून नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या ह्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिल्याने हा अपघात झाला. गुरुवारी (दि.२३) सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमाराला ही घटना घडली. ह्या अपघातात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सात आरोग्य कर्मचारी आणि वाहनचालक जखमी झाले आहेत.
जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी सर्व जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. गरुडेश्वर येथील लसीकरण आटोपून वाडीवऱ्हे प्राथमिक आरोग्य केंद्राचे वाहन (क्र. एमएच १५ एबी १२७) आरोग्य केंद्राच्या दिशेने जात होते. सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास ह्या वाहनाला मागून येणाऱ्या ट्रकने धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात वाहनचालक रज्जाक शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. विजय माळी, श्रावण खैरनार, निकिता कापडणे, शोभा मोरे, स्वप्नाली डोंगरे, भाग्यश्री घरटे, सुनीता अस्वले, वर्षा पवार जखमी झाले. याबाबत माहिती समजताच जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराज मोफत रुग्णवाहिकेचे रुग्णवाहक रुग्णमित्र निवृत्ती गुंड यांनी तातडीने जखमींना नाशिकच्या शासकीय रुग्णालयात दाखल केले. अपघात झाल्याचे माहीत होताच मदतीचा ओघ सुरू झाला. वाडीवऱ्हे पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून, तपास सुरू केला आहे.
फोटो- २३वाडीवऱ्हे ॲक्सिडेंट
230921\23nsk_55_23092021_13.jpg
फोटो- २३वाडीवऱ्हे ॲक्सीडेंट