कजवाडे शिवारात अपघात; एक ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:13 AM2020-12-08T04:13:02+5:302020-12-08T04:13:02+5:30

----- अत्याचारप्रकरणी आरोपीस अटक मालेगाव : घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सलमान खान ...

Accident in Kajwade Shivara; One killed | कजवाडे शिवारात अपघात; एक ठार

कजवाडे शिवारात अपघात; एक ठार

Next

-----

अत्याचारप्रकरणी आरोपीस अटक

मालेगाव : घरात घुसून महिलेवर लैंगिक अत्याचार करीत जीवे ठार मारण्याची धमकी देणाऱ्या सलमान खान ऊर्फ राजा शेख हसन, रा. देवीचा मळा याला पवारवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्यास न्यायालयासमोर उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. पीडित महिलेने फिर्याद दिली. २७ नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, अधिक तपास उपनिरीक्षक नाजीम शेख करीत आहेत.

-----

अल्पवयीन मुलीस पळविले

मालेगाव : शहरातील रमजानपुरा भागातील गट नं. २१३/१ अश्रफ मशिदीजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलीस घरात झोपलेली असताना अज्ञात इसमाने रविवारी पहाटे ते सकाळी ८ वाजेदरम्यान पळवून नेले. मुलीच्या आईने रमजानपुरा पोलिसांत फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात इसमाविरोधात गुन्हा दाखल केला. अधिक तपास उपनिरीक्षक आगे करीत आहेत.

-----

ट्रकचालकास कटरने मारहाण

मालेगाव : शहरातील पवारवाडी भागात नवी बस्ती येथे वसीमखान मुनीरखान (३२, रा. ग. नं. १) या ट्रकचालकास व त्याच्या साथीदारास उबेदूर रहेमान अन्सारी हा मागील भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून दम देत होता. फिर्यादी वसीमखान त्याला समजावून सांगत असताना त्याचा राग येऊन उबेदूर अन्सारी याने फिर्यादीच्या हातावर, बोटावर कटरने वार करून जखमी केले, तर त्याचा साथीदार नदीम अहमद याला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास पोलीस नाईक उबाळे करीत आहेत.

Web Title: Accident in Kajwade Shivara; One killed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.