शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दुचाकीस्वाराच्या हुलकावणीमुळे बसला अपघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2021 23:14 IST

सुरगाणा : बसला हुलकावणी देणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात मानव विकास संशोधन स्कूल बसला अलंगुणजवळील बोरीपाडा येथील वळणावर किरकोळ अपघात झाला होता. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने बसमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाजले.

ठळक मुद्देसुरगाणा : चालकाने प्रसंगावधान राखत वाचवले विद्यार्थ्यांचे प्राण

सुरगाणा : बसला हुलकावणी देणाऱ्या दुचाकीस्वाराला वाचविण्याच्या नादात मानव विकास संशोधन स्कूल बसला अलंगुणजवळील बोरीपाडा येथील वळणावर किरकोळ अपघात झाला होता. चालकाने प्रसंगावधान राखत वेळीच गाडीवर नियंत्रण मिळविल्याने बसमधील विद्यार्थ्यांचे प्राण वाजले.शनिवारी (दि.९) दुपारी साडेबारा वाजेच्या दरम्यान अलंगुण येथील महाविद्यालय सुटल्यावर हातरुंडी, उंबरदे, पळसन, पळशेत, आमदा, वांगण या भागातील विद्यार्थी मानव संसाधन विकास कळवण आगाराची बसने (एम एच ०७ सी ९५१४) घरी परतत असताना वळणावर अचानक हातरुंडीच्या दिशेने वेगात दुचाकीस्वार समोर आल्यावर त्याला वाचवण्याच्या नादात बस रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत केबलच्या चारीत टायर फसल्याने बस पुढे न जाता जागीच थांबली. बस थांबताच विद्यार्थ्यांनी संकटकालीन दरवाजातून उड्या मारल्या. सर्व विद्यार्थी सुखरूप असून कोणत्याही प्रकारची जीवितहानी टळली.रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाचा आधार मिळाल्याने बस पलटी होण्यापासून वाचली त्यामुळे बसमधील विद्यार्थ्यांना काहीही दुखापत झाली नाही. चारीत टायर्स फसले नसते तर पुढे असलेल्या नदीवरील सिमेंट प्लग साठवण बंधाऱ्यात अथवा भाताच्या खाचरातून नदीत जाऊन पडली असती. बसमध्ये ३५ ते ४० शालेय विद्यार्थी प्रवास करीत असल्याचे प्रत्यक्षदर्शी हातरुंडी येथील राजू पवार यांनी सांगितले.दुचाकी स्वाराने घटना पाहताच जागेवरून पळ काढला. त्यामुळे पुन्हा एकदा विनापरवाना बेफामपणे दुचाकी चालविणाऱ्या तरुणांचा वाहतूक शाखेच्या पोलिसांनी वेगात दुचाकी चालकांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी पालकांनी केली आहे.घटना समजताच पंचायत समितीचे सभापती इंद्रजित गावीत, राहुल गावीत, वसंत बागुल यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत विद्यार्थ्यांना बसमधून सुखरूप उतरविण्यास मदत केली व धीर दिला. विद्यार्थी सुखरूप पाहून वाहक तसेच चालकांना पालकांनी धन्यवाद देत आभार मानले.

टॅग्स :Bus DriverबसचालकAccidentअपघात