शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक बाजार समितीत किरकोळ विक्रेत्यांना प्रवेश बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 15:56 IST

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात

ठळक मुद्देसंयुक्त बैठकीत निर्णय : चवली, दलालांनाही मज्जावदुचाकी वाहनाला बाजार समितीत प्रवेशबंदी

लोकमत न्यूज नेटवर्कनाशिक : कोरोना विषाणूंच्या वाढत्या प्रादुर्भावाने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत दैनंदिन भाजीपाला खरेदी-विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, आडते व हमाल मापारी आणि नागरिक यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून, संसर्ग टाळण्यासाठी सोशल डिस्टन्स पाळला जात नाही. त्याचबरोबर वाढत्या गर्दीमुळे बाजार समितीत वाहन कोंडी होत असल्याच्या पार्श्वभूमीवर बाजार समितीने खबरदारीची उपाययोजना म्हणून किरकोळ शेतमाल विक्री करणाऱ्या शेतकरी व खरेदी-विक्री करणा-या चवली, दलालांना बाजार समितीत प्रवेश बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही दिवसांपासून बाजार समितीत शेतमाल विक्रीसाठी येणारे शेतकरी, व्यापारी, भरेकरी व भाजीपाला खरेदीसाठी येणा-या ग्राहकांची हजारोंच्या संख्येने गर्दी होत असल्याने कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात होती. यासंदर्भात तक्रारीही करण्यात आल्याने अखेर यावर तोडगा काढण्याचे ठरविण्यात आले. त्यासाठी यासंदर्भात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी पोलीस अधिकारी, बाजार समिती संचालक तसेच व्यापारी यांच्यात संयुक्त बैठक घेण्यात आली. पेठरोडवर असलेल्या बाजार समितीत दैनंदिन टमाटा, कांदा, बटाटा, द्राक्ष, डाळिंब यांचे तर दिंडोरी रोडवरील मुख्य बाजार समितीत फळ व पालेभाज्यांचे लिलाव होतील. ज्या शेतकऱ्यांना लिलावात भाजीपाला विक्री करायचा नाही तो किरकोळ विक्री करायचा अशा शेतक-यांना दोन्ही बाजार समितीत नो एंट्री असून, अशा शेतक-यांनी त्यांचा शेतमाल मनपाने ठरवून दिलेल्या ४३ अधिकृत जागेवर विक्री करावा. दोन्ही बाजार समितीत किरकोळ खरेदी-विक्री करणा-या चवली, दलालांना बंदी करण्यात आली. किरकोळ खरेदीसाठी दुचाकी वाहनाला बाजार समितीत प्रवेशबंदी करण्यात आली आहे. बाजार समितीने हमाल, मापारी यांना ओळखपत्र द्यावे. किरकोळ भाजीपाला विक्री बंद असल्याबाबत बाजार समितीत फलक लावण्यात यावा तसेच किरकोळ विक्री करणाºयांवर कारवाई करणे, बाजार समिती सचिवांनी वाशी, नवी मुंबई येथील बाजार समिती संपर्कात राहून तेथील घडामोडी तसेच किती वाहनांना प्रवेश दिला जाणार आहे.

 

टॅग्स :APMCपुणे कृषी उत्पन्न बाजार समितीNashikनाशिक