शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

इगतपुरीत पेरणीपूर्व मशागतीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2020 22:40 IST

इगतपुरी तालुक्यासह आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी कोरोनाच्या सावटाखाली पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात सध्या पाहायला मिळत आहे.

ठळक मुद्देमजुरांना रोजगार : बी, बियाणांसाठी शेतकऱ्यांची धावपळ

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यासह आदिवासी, दुर्गम भागातील शेतकरी कोरोनाच्या सावटाखाली पेरणीपूर्व मशागत करण्यात व्यस्त असल्याचे चित्र इगतपुरी तालुक्यात सध्या पाहायला मिळत आहे.लॉकडाउन असल्याने शेतकऱ्यांसह शेतमजूर घरीच बसले होते; मात्र खरिपाच्या पेरणीसाठी महत्त्वाच्या मशागतीची कामे सुरू झाल्यामुळे शेतमजुरांना रोजगार उपलब्ध झाला आहे.भात, नागली, वरई आदी खरीप पिकांच्या पेरणीपूर्वी शेताची मशागत करणे महत्त्वाचे असते. तालुक्यातील मुख्य भात पिकाच्या पेरणीसाठी व आवणीसाठी काही दिवसांअगोदरच शेतीची नांगरणी व वखरणी करण्याचे काम वेगाने होताना दिसत आहे.मशागतीसाठी तालुक्यातील आदिवासी, दुर्गम भागात बैलजोडीचा वापर होतो, तर काही भागात ट्रॅक्टरनेही मशागत केली जाते. तालुक्यात सध्या कोरोनाचे कोणतेही संकट नसले तरीही ते आपल्यावर येऊ नये याची पुरेपूर दक्षता घेत शेतकरी व शेतमजूर आपला बराच वेळ शेतकामात घालवत आहे. मजुरीचे कामे करताना सोशल डिस्टन्सिंगचे पालन केले जात आहे.यावर्षी अनेकवेळा बेमौसमी व अवकाळी पाऊस व गारपीट झाल्याने शेतकरी संकटात सापडला होता. या सर्व संकटांवर मात करत खरीप पिकांच्या पेरणीसाठी बी-बियाणे, खतांसाठी पैशांची कशीबशी तजवीज करून ते खरेदी करण्यासाठी लगबग सुरू आहे. तसेच पुढील काळात जनावरांच्या वैरणीचीही साठवण शेतकरी करताना दिसत आहे.देशात कोरोनाचा उपद्रव असला तरीही शेतकरी आपल्या शेतकामात व्यस्त आहेत. काहीही झाले तरी शेतीत पेरणी करून उत्पन्न घ्यावेच लागेल. शेतकरी अन्नदाता असून तोही संकटात सापडला आहे. तरीही पैशांची कशीबशी तजबीज करून बी-बियाणे, खते यांची खरेदी करीत आहे.- भगवान पारधीशेतकरी, खेडभैरवइगतपुरी तालुक्यासह पूर्व भागात खरीप पिकांच्या पेरणीपूर्व मशागतीला वेग आला आहे. तसेच शेतकरी बी-बियाणे, खते आदींच्या खरेदीसाठी येत आहेत. कृषिसेवा केंद्रामध्ये शेतकरी सर्व नियमांचे पालन करीत आहेत. शेतकºयांच्या बांधावर जाऊन खते, बी-बियाणांचा पुरवठा करण्याचा प्रयत्न करीत आहोत.- सागर वाजेकृषिसेवा केंद्र, खेडभैरव

टॅग्स :Farmerशेतकरी