शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या हालचालींना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2019 19:49 IST

जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येवरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप केले जाणार आहे. मात्र कोणत्या पक्षाला कोणत्या विषय समित्या देण्यात येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेत अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात

ठळक मुद्देइच्छुकांची फिल्डिंग : जागावाटपाकडे साऱ्यांचे लक्ष कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे याबाबत अंतिम निर्णय घेतील.

लोकमत न्युज नेटवर्कनाशिक : जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व पदाधिकाऱ्यांच्या निवडणुकीसाठी एक आठवड्याचा कालावधी शिल्लक असताना इच्छुकांच्या हालचालींनी वेग घेतला असून, त्यासाठी नाशिक भेटीवर आलेल्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या भेटी-गाठी घेतल्या जात आहेत. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी महाविकास आघाडी या निवडणुकीत एकत्र राहणार असल्याचे जाहीर केल्यामुळे भाजपचे मनसुबे उधळले गेले आहेत, तर कॉँग्रेसमध्ये सभापतिपदासाठी लॉबिंग सुरू झाली आहे.

जिल्हा परिषदेतील सदस्य संख्येवरच अध्यक्ष, उपाध्यक्ष व विषय समित्यांच्या सभापतींचे वाटप केले जाणार आहे. मात्र कोणत्या पक्षाला कोणत्या विषय समित्या देण्यात येणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. शिवसेनेत अध्यक्षपदासाठी जोरदार फिल्डिंग लावली जात असून, नाशिक भेटीवर आलेले खासदार संजय राऊत यांच्या भूमिकेकडे सा-यांचे लक्ष आहे. सेनेत बाळासाहेब क्षीरसागर, रमेश बोरसे, उषा दराडे, भास्कर गावित यांच्या नावांची चर्चा असली तरी, विद्यमान अध्यक्षा शीतल सांगळे ह्यादेखील उर्वरित दोन वर्षांचा कार्यकाळ आणखी मिळाल्यास काम करण्यास तयार आहेत. इच्छुकांनी आपापल्यापरिने मातोश्रीपर्यंत आपली इच्छा पोहोचविली असून, त्यात कोण यशस्वी होतो हे महत्त्वाचे आहे. तर राष्टÑवादीनेदेखील अध्यक्षपद मिळाल्यास बरे होईल, अशी भावना यापूर्वीच व्यक्त केली आहे. त्यासाठी यतिन पगार यांनी इच्छा व्यक्त केली असली तरी, सदस्य संख्येचा विचार करता, राष्टÑवादीला अध्यक्षपद मिळणे कठीण आहे. उपाध्यक्षपदासाठी संजय बनकर, महेंद्रकुमार काले, उदय जाधव यांच्या नावांची चर्चा होत असून, ज्यांना यापूर्वी पदे मिळाली त्यांच्या ऐवजी अन्य सदस्यांना संधी देण्याचा निर्णय पक्षाने घेतला आहे. कॉँग्रेसच्या वाट्याला सभापतिपद मिळू शकते. आठ सदस्यांच्या संख्येचा विचार करता एक सभापतिपद देण्यात येईल, परंतु त्यासाठी जवळपास सर्वांनीच इच्छा प्रदर्शित केली आहे. अश्विनी आहेर, यशवंत गवळी यांची नावे घेतली जात असून, त्यातही समाजकल्याण सभापतिपद पक्षाकडे राहिल्यास यशवंत गवळी यांची वर्णी लागू शकते. गवळी हे गेल्या २५ वर्षांपासून जिल्हा परिषदेचे सदस्य आहेत. कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा महसूलमंत्री बाळासाहेब थोरात हे याबाबत अंतिम निर्णय घेतील.

टॅग्स :zpजिल्हा परिषदnashik Jilha parishadनाशिक जिल्हा परिषद