शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

लॉकडाऊनमध्येही समृद्धीच्या कामाला गती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2021 01:32 IST

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. 

ठळक मुद्दे५१ टक्के काम  : पुलाचे कामही पूर्णत्वाकडे

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीतून जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील सर्वात मोठा बोगदा आणि उड्डाणपुलाचे काम लॉकडाऊनच्या काळातही युद्धपातळीवर सुरू आहे. या मार्गावरील सर्वात मोठ्या लांबीचा बोगदा तसेच उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यात आली असून, निर्धारित वेळेत काम पूर्ण करण्यासाठीचे नियोजन करण्यात आले आहे. मागील वर्षी लॉकडाऊनमुळे कारागीर तसेच मजुरांचा मोठा प्रश्न निर्माण झाल्याने काही प्रमाणात काम मंदावले असले तरी कामात खंड पडलेला नव्हता. यंदाची परिस्थिती मागील वर्षीच्या तुलनेत चांगली असून, येथील कामाने गती घेतली आहे. नियमित कोरोना चाचणी करण्याबरोबरच सुरक्षितता नियमांचे पालन करून कामकाज सुरू असल्याने काम बऱ्यापैकी पुढे सरकले आहे. मुंबई ते नागपूर असा सुमारे ७०१ किलोमीटर लांबीचा समृद्धी महामार्ग नाशिक जिल्ह्यातून जात आहे. इगतपुरी ते ठाणे दरम्यान ७.६८ किलोमीटर लांबीचा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बागदा या मार्गावर तयार होत आहे. सध्या ३ किलोमीटरच्या पुढे बोगद्याचे काम सरकले आहे. राज्यातील दहा मुख्य जिल्हे  आणि इतर १४ जिल्ह्यांमधून हा सुपरफास्ट महामार्ग जाणार आहे. या महामार्गाचे १ ते १६ असे टप्पे असून, नाशिक जिल्ह्यातील बोगद्याचे काम हे १४व्या टप्प्यात सुरू आहे. सप्टेंबर २०२२ मध्ये या बोगद्याचे काम पूर्ण करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. या मार्गावर दोन डोंगरांना जोडणारा सर्वात मोठा पूल तयार होत आहे, तर दुसरा सर्वात उंच पूलदेखील उभारण्यात येणार आहे.  बोगद्याची उंची ९.१२ मीटर, तर रुंदी  १७.६१ मीटर इतकी आहे. डाव्या बाजूने होणारा बोगदा हा ७.७८ किलो मीटर लांबीचा आहे.n मागील वर्षी कोरोनामुळे येथील कामकाजावर काही प्रमाणात परिणाम झाला होता. यंदा देशभरात लॉकडाऊन नसल्याने मजुरांचा प्रश्न निर्माण झाला नसला तरी बाधित होणाऱ्यांचे प्रमाण वाढल्यामुळे चिंता वाढली होती.n त्यावर मात करीत सर्व खबरदारी घेत येथील कामकाज सुरूच ठेवण्यात आले. दर महिन्याला कोरोना चाचणीचा कॅम्प घेतला जातो. आरोग्याची तपासणी करून कामगारांच्या कामाचे नियोजन केले जात आहे.

टॅग्स :NashikनाशिकSamruddhi Mahamargसमृद्धी महामार्ग