शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

संत निवृत्तीनाथ मंदीराच्या काळ्या पाषाणातील कामाला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 13:41 IST

त्र्यंबकेश्वर : येथील श्री संतश्रेष्ठ सदगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराचे काळ्या पाषाणात होणाऱ्या कामाला वेग आला असून आकर्षक शिल्पकला सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

त्र्यंबकेश्वर : येथील श्री संतश्रेष्ठ सदगुरु निवृत्तीनाथ महाराज यांच्या संजीवन समाधी मंदीराचे काळ्या पाषाणात होणाऱ्या कामाला वेग आला असून आकर्षक शिल्पकला सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.सध्या हे काम पनवेल येथील तिडके कॉन्ट्रक्टर करीत असुन अत्यंत सुरेख व शिल्पकलेचा अद्वितीय नमुना असे समाधी मंदीर सध्या कळसाकडे आकार घेत आहे. आतापर्यंत झालेले काम अत्यंत सुंदर झाले आहे. या संदर्भात संस्थानचे अध्यक्ष पवनकुमार भुतडा म्हणाले, मंदीराचे संपूर्ण काम काळ्या पाषाणाचे असुन पाषाणावर होणारी शिल्पकलेचे काम रेखीव होत आहे. संत निवृत्तीनाथ महाराज यात्रेपर्यंत काम पुर्ण होणार नसल्याने मंदीराचे काम अपुर्णावस्थेत राहील, असे विश्वस्तांनी सांगितले.साधारणपणे समाधी मंदीराचे काम फेब्रुवारी अखेर पुर्ण होईल अशी अपेक्षा अध्यक्ष भुतडा यांनी व्यक्त केली. संपुर्ण समाधी मंदीराचा जीर्णोध्दार मंदीर काळ्या पाषाणातच व्हावे असा आग्रह संस्थानचे भुतपुर्व अध्यक्ष विद्यमानज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड यांच्या कार्यकाळात एकमताने घेण्यात आला होता. त्यांच्याच कार्यकाळात कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. मंदीर पाषणाच्या कामासाठी सरकारने २२ कोटी रूपये देण्याचे आदेश दिलेले आहेत. यासाठी लवकरच संत निवृत्तीनाथ महाराज समाधी संस्थानचे विश्वस्त शिष्टमंडळ घेउन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी जाणार असल्याचे समजते. याशिवाय केंद्र शासना कडुन तीन वर्षांपुर्वी प्रसाद योजना कार्यान्वित झाली. संपुर्ण भारतातुन फक्त आठच तिर्थस्थळे, ज्यांचा विकास पर्यटनाच्या दृष्टीने देखील होउ शकेल अशी. त्यात संपुर्ण महाराष्ट्रातुन केवळ त्र्यंबकेश्वरसाठी प्रसाद योजना मंजुर झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिक