लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील नक्षत्र चांगले बरसल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना आता सुरुवात झाली असल्याने खरिपाचे पेरणी उद्दिष्ट पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.दिंडोरी तालुक्यातील असंख्य गावांमध्ये यंदाही पावसाचा लपंडाव सुरू होता. त्यामुळे खरीप हंगामातील पेरण्या लांबल्याने बळीराजाची चिंता वाढली होती; परंतु मागील काही नक्षत्रे चांगली बरसल्याने व पेरणीची जमिनीतील ओल व वापसा वाढल्याने आता तालुक्यात खोळंबलेल्या पेरण्यांना गती मिळाली आहे.मागील भरवशाच्या काही नक्षत्रांनी पाठ फिरविल्याने ज्या पेरण्या झाल्या होत्या, त्याठिकाणी दुबार पेरणीचे संकट ओढवले होते. काही पिके पाण्याअभावी पिवळी पडली होती. महागडे बियाणे खरेदी करून पेरण्या केल्या; परंतु पावसाने लहरीपणा दाखवीत दडी मारल्याने बियाणांचा खर्च वाया गेला; परंतु पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने बळीराजाच्या आशा पल्लवित झाल्या. त्यामुळे सध्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती दिल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. आता राहिलेल्या पेरण्या पूर्ण होतील अशी आशा शेतकऱ्यांत निर्माण झाली आहे.दोन दिवसांत तालुक्यातील पाऊसमोहाडी - ००.०० मि.मी.उमराळे - ०३.०० मि.मी.कोशिंबे - ०१.०० मि.मी.ननाशी - ०१.०० मि.मी.वरखेडा - ००.०० मि.मी.वणी - ००.०० मि.मी.दिंडोरी - ००.०० मि.मी.लखमापूर - ००.०० मि.मी.रामशेज - ०१.०० मि.मी.खरीप हंगामातील पेरणीची आकडेवारी :-सोयाबीन - ५५ टक्केमका - ६० टक्केटोमॅटो - ६० टक्केभाजीपाला- टक्केभात - ६५ टक्केनागली - २५ टक्केइतर कडधान्य- ४० टक्के.
दिंडोरीत पावसाच्या विश्रांतीमुळे खोळंबलेल्या पेरण्यांना वेग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 7, 2021 19:08 IST
लखमापूर : दिंडोरी तालुक्यात मागील नक्षत्र चांगले बरसल्याने शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने विश्रांती घेतल्याने खोळंबलेल्या पेरण्यांना आता सुरुवात झाली असल्याने खरिपाचे पेरणी उद्दिष्ट पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
दिंडोरीत पावसाच्या विश्रांतीमुळे खोळंबलेल्या पेरण्यांना वेग
ठळक मुद्देखरिपाचे उद्दिष्ट पूर्ण होण्याचा मार्ग मोकळा