शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

द्राक्ष बागांच्या खरड छाटणीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 20:18 IST

सायखेडा : यंदा सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेची खरड छाटणी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.

ठळक मुद्देलॉकडाऊनच्या भीतीने मजूर गावाकडे जाण्याच्या तयारीत

सायखेडा : यंदा सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेची खरड छाटणी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.होळीसाठी मजूर गावाकडे गेले आहे मोजक्या मजुरांवर छाटणीची जबाबदारी पडली असून छाटणीला वेग आला आहे, शेतकऱ्यांची लगीनघाई सुरु आहेयंदा सुद्धा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता लॉकडाऊन होईल अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लवकरात लवकर आपल्या द्राक्ष बागेची खरड छाटणी व्हावी यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत.होळीसाठी मजूर गावाकडे गेले आहे मोजक्या मजुरांवर छाटणीची जबाबदारी पडली असून छाटनीला वेग आला आहे, शेतकऱ्यांची लगीनघाई सुरु आहेएप्रिल महिना सुरु झाल्यावर खरड छाटणी केली जाते. मे महिन्याच्या मध्यन्तरापर्यंत खरड छाटणी केली जाते. मागील वर्षी मार्च महिन्यात लॉकडाऊन झाले होते. छाटणी करणारे मजूर हे पेठ, सुरगाणा, तालुक्यातील असल्यामुळे त्यांच्यावर शेतकऱ्यांना अवलंबुन रहावे लागते.मागील वर्षी सर्व मजूर गावाकडे निघून गेले होते. त्यामुळे छाटणीची समस्या निर्माण झाली होती. जादा दर देऊन स्थानिक मजुरांकडून काही शेतकऱ्यांनी छाटणी केली होती. तर काही शेतकऱ्यांनी घरातील माणसांकडूनच छाटणी करुन घेतली होती.मजुरांना सुद्धा लॉकडाऊन कधी होईल याची भीती आहे. चार पैसे मिळवण्यासाठी दिवसरात्र मेहनत करत आहे. मागील वर्षासारखे लॉकडाऊन झाले तर, गावसोडून कामासाठी येता येत नाही आणि कुटुंब कसे चालवावे ही समस्या समोर उभी रहाते म्हणून चार दिवसात जास्तीत जास्त पैसे पदरात पाडून घेण्यासाठी जोरात काम सुरु आहेत.अनेक शेतकऱ्यांना खरड छाटणीसाठी आत्ताच मजूर मिळणे अवघड होत आहे. गावात मोजक्या मजुरांचे गृप शिल्लक आहे. त्यामुळे प्रत्येक शेतकरी काम उरकून घेण्यासाठी धडपड करत आहे. खरड छाटणी ही द्राक्ष शेतीतील महत्वाची प्रक्रिया आहे, ती वेळेत होणे गरजेचं आहे, उशीर झाल्यावर काडी पक्वतेसाठी अडचणी येतात म्हणून लवकरात लवकर छाटणी होण्यासाठी शेतकरी आग्रही असतात.पुढील वर्षाच्या फळधारणेच्या प्रक्रियेसाठी द्राक्ष बागेची खरड छाटणी अतिशय महत्वाची असते, द्राक्ष विक्री झाल्यानंतर झाडावरील जुनी काडी छाटून नवीन फुटणाऱ्या काडीमध्ये सबकेन करून फळधारणा केली जाते. 

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी