शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

राज्यपालांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर तयारीला वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2021 00:41 IST

सटाणा : शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक सुशोभीकरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) सटाणा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे व अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांनी बुधवारी (दि.२७) देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, स्मारक सुशोभीकरणाची जागा व कार्यक्रमाचे नियोजित ठिकाण चित्रा सिनेमाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.

ठळक मुद्दे जिल्हाधिकाऱ्यांकडून पाहणी : परिसरातील स्वच्छतेबाबत सूचना

सटाणा : शहराचे आराध्य दैवत संत शिरोमणी देवमामलेदार श्री यशवंतराव महाराज स्मारक सुशोभीकरण समारंभासाठी महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे बुधवारी (दि. ३ फेब्रुवारी) सटाणा दौऱ्यावर येत असल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे व अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभम गुप्ता यांनी बुधवारी (दि.२७) देवमामलेदार यशवंतराव महाराज मंदिर, स्मारक सुशोभीकरणाची जागा व कार्यक्रमाचे नियोजित ठिकाण चित्रा सिनेमाची पाहणी करून उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या.जगात एकमेव महसूल अधिकाऱ्याचे मंदिर असलेल्या यशवंतराव महाराज यांचा सर्वांनाच अभिमान असून राज्यपाल कोशारी यांना यशवंतराव महाराज यांच्याबाबत सविस्तर माहिती देण्यासाठी महाराजांबद्दल विस्तृत माहिती असणाऱ्या हिंदी भाषिकाची नेमणूक करण्याची सूचना जिल्हाधिकारी मांढरे यांनी पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे यांना केली. यावेळी जिल्हाधिकारी मांढरे यांनी नियोजित स्मारक परिसरात व जुन्या ऐतिहासिक इमारतीत असलेल्या अस्वच्छतेबाबत नाराजी व्यक्त करत स्वच्छतेची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे आदेश संबंधितांना दिले.हा कार्यक्रम केवळ नगरपरिषदेपुरता सीमित नसून संभाव्य टीका-टिप्पणी टाळण्यासाठी कार्यक्रमाची कोनशीला व्यवस्थित तपासून घेण्याची सूचना करत सर्व लोकप्रतिनिधींना विश्वासात घेत कार्यक्रमाचे नियोजन करण्याच्या सूचनादेखील जिल्हाधिकारी मांढरे यांनी मुख्याधिकारी डगळे व यशवंतराव महाराज ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड यांना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्यासमवेत अप्पर जिल्हाधिकारी धनंजय निकम, प्रांत विजय भांगरे, पालिकेच्या मुख्याधिकारी हेमलता डगळे, ट्रस्टचे अध्यक्ष भालचंद्र बागड, नगरसेवक दीपक पाकळे, पालिकेचे जनसंपर्क अधिकारी हिरालाल कापडणीस आदींसह नगरपरिषदेच्या सर्व विभागांचे विभागप्रमुख उपस्थित होते.भूमिपूजन नव्हे सुशोभीकरणकार्यक्रमाचे नियोजित ठिकाण चित्रा सिनेमागृहाची पाहणी जिल्हाधिकारी मांढरे यांनी केली असता कार्यक्रमाच्या दिवशी या ठिकाणी प्रवेश करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पास देण्याच्या सूचना केल्या शिवाय खुर्च्यांचे नियोजन देखील काटेकोरपणे करून अतिमहत्त्वाच्या व्यक्तींसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी पालिकेच्या अधिकाऱ्यांना दिल्या. जुन्या ऐतिहासिक इमारतीचेच सुशोभीकरण करण्यात येणार असल्याने या कार्यक्रमाला भूमिपूजन समारंभ हा ह्यशब्दह्ण न वापरता सुशोभीकरण समारंभ असे म्हणायला हवे, असेही जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :bhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीnashik collector officeनाशिक जिल्हाधिकारी कार्यालय