शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

ए.सी. सरकार संघटनेचा आदिवासींसाठी लढा सुरुच राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 20, 2020 18:16 IST

मधुकर गावीत : कार्यकर्त्यांचा जनजागृती मेळावा

ठळक मुद्देआदिवासी समाजासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांचा फायदा नाही.

सटाणा : आदिवासी समाजावर होणाऱ्या अन्यायाविरु द्ध १९३० पासून अ‍े.सी. कुँवर केसरी सिंह यांनी सुरू केलेले आंदोलन यापुढेही समाजाच्या न्याय हक्कासाठी सुरूच राहील, असे प्रतिपादन अ‍े.सी. सरकार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मधुकर गावीत यांनी बागलाण तालुक्यातील कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलतांना केले.तालुक्यातील अजमेर सौंदाणे जवळील दुधमाळ वस्तीवर संघटनेच्या कार्यकर्त्यांचा जनजागृती मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करतांना गावीत म्हणाले, आजही आदिवासी समाजासाठी शासनाने सुरू केलेल्या योजनांचा फायदा होत नाही. यापुढे आदिवासी बांधवानी ग्रामपंचायतीच्या प्रत्येक ग्रामसभेस हजर राहून आपल्या मागण्यांचा ठराव करून घ्यावा. जंगलामध्ये तयार केलेली शेती त्यांच्या नावे करून त्याचा सातबारा उतारा तात्काळ तयार करून द्यावा. या जमीनीचा मूळ मालक आदिवासी असूनही त्याला शासनाच्या वन विभागाकडून त्रास देण्याचा प्रकार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांनी जमिनीतील पिक पहाणीची नोंद संबंधीत विभागाकडून वेळोवेळी करून घेणे, आदिवासी बांधवांच्या बळकावलेल्या जमिनी परत घेऊन त्यांना न्याय देण्यासाठी हा लढा असून यापुढे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशाराही त्यांनी यावेळी दिला. यावेळी गुजरात राज्यातुन आलेल्या राजुभैय्या, जिल्हा अध्यक्ष म्हाळु पवार यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी सरचिटणीस संजय अभिमन दळवी, तालुका अध्यक्ष भरत बोरसे, शहर अध्यक्ष छोटू दळवी, उखा सोनवणे ,शिवदास जिभाऊ सोनवणे, सोमनाथ छगन गायकवाड, मगन दादा, हीरालाल गौजी, बाज्या डूल्या, शिड्या मांजा, हीलाबाई कोटया, राजा शिड्या, बारमल बोरसे, बापू रामदास जाधव, पांडू सोनवणे आदींसह तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nashikनाशिक