शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

कोविडमुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांना पुन्हा मिळणार परीक्षेची संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 01:11 IST

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याचा प्रयत्न (अटेंम्ट ) मोजण्यात येऊ नयेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या असून, त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ठळक मुद्दे वैद्यकीय परीक्षा : आरोग्य विद्यापीठाच्या परीक्षा मंडळ बैठकीत निर्णय

नाशिक : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या हिवाळी २०२० परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होणार आहेत. या परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांची कोविड चाचणी पॉझिटिव्ह निघाल्यामुळे परीक्षेस अनुपस्थित राहाव्या लागणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विशेष परीक्षा घेण्यात येणार आहेत. अशा विद्यार्थ्यांचा अनुपस्थितीत राहिल्याचा प्रयत्न (अटेंम्ट ) मोजण्यात येऊ नयेत, अशा सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांनी केल्या असून, त्यानुसार विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आली आहे.कोविड १०च्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणी येऊ नयेत, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी दिल्या आहेत. त्या अनुषंगाने प्रभारी कुलगुरू डॉ.नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली नाशिक येथे झालेल्या विद्यापीठाच्या परीक्षा मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, विद्यापीठाच्या हिवाळी-२०२० लेखी परीक्षेस कोविड १९ आजाराचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे अनुपस्थित राहतील, अशा विद्यार्थ्यांची हिवाळी-२०२० लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर, घेण्यात येणाऱ्या विशेष परीक्षेसाठी अनुपस्थित असलेल्यांचा प्रयत्न ग्राह्य धरला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले असून, विशेष परीक्षेचा दिनांक यथावकाश जाहीर करण्यात येणार आहे.विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्यवैद्यकीय परीक्षेस बसणारे विद्यार्थी परीक्षेचे प्रवेशपत्र घेऊन कोणत्याही शासकीय रुग्णालय, तसेच शासनमान्य कोविड रुग्णालयात स्वतःची आरटीपीसीआर चाचणी विनामूल्य करून घेऊ शकणार आहेत, तसेच जे विद्यार्थी वैद्यकीय महाविद्यालयातील वसतिगृहात राहण्यास इच्छुक आहेत, अशा विद्यार्थ्यांची वसतिगृहात वैयक्तिक अंतर राखून राहण्याची सोय करण्यात यावी, वसतिगृहाच्या मेसमध्ये भोजनाची सोय करण्यात यावी, वसतिगृहाची स्वच्छता व निर्जंतुकीकरण वेळोवेळी करण्यात यावे, तसेच सर्व प्रकारची काळजी घेऊनच वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्यात याव्यात, असेही वैद्यकीय महाविद्यालयांच्या अधिष्ठाता यांना कळविण्यात आल्याचे विद्यापीठ प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

टॅग्स :Studentविद्यार्थीexamपरीक्षा