शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

येवल्यात सुमारे ६०० हातमाग बंद

By admin | Updated: February 19, 2017 01:10 IST

नोटाबंदी : रेशीम कडाडल्याने राजवस्त्राला घरघर

दत्ता महाले : येवलाशहराची आर्थिक बाजारपेठ अवलंबून असणाऱ्या पैठणीला नोटाबंदीनंतर गेल्या दोन महिन्यापासून उतरती कळा लागली असून, ऐन दुष्काळात तेरावा महिना म्हणून गेल्या दोन महिन्यात रेशमाचे भाव हजार ते बाराशे रुपयांनी वाढल्याने सिंगल व डबल पदर रेशमी पैठणीचे भाव १०० ते १२०० रु पयांनी घसरल्याने विणकरांची चिंता वाढली आहे. कच्चा मालाचे (रेशीम) भाव वाढले आणि पक्का मालाचे (पैठणी) भाव कमी झाल्याने पैठणीसह विणकरांचे अर्थशास्त्र बिघडले आहे. गेल्या दोन महिन्यात येवल्यासह परिसरातील सुमारे  ३५०० हातमागापैकी ५०० ते ६०० हातमाग बंद पडले आहेत. पैठणीच्या अनेक कारागिरांच्या हाताला काम नसल्याने त्यांचे प्रपंच धोक्यात आले आहेत. नोटाबंदीपूर्वी रेशीम खरेदी-विक्रीचा व्यवहार मोठ्या प्रमाणावर रोखीत चालत होता. सध्या चिठ्ठीवर रेशमाचा व्यवहार चालत होता. परंतु नोटाबंदीच्या वातावरणात व्यापारी चेक देणे-घेणे असून अडचण नसून खोळंबा अशी स्थिती निर्माण झाली आहे. पैठणी विक्रीचे  चेक क्लिअरिंग व्हायला महिना उलटून जात आहे. शेतकऱ्याच्या कांद्याला जशी घसरण लागली आणि कांद्याचा वांधा झाला आणि शेतकरी अडचणीत आले तशीच परिस्थिती येवल्याच्या पैठणीबाबत सध्या झाली आहे. शहराची मुख्य बाजारपेठ ही कांदा व पैठणीवर अवलंबून आहे.