शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

घरपट्टी-पाणीपट्टीचे सुमारे ३३ कोटी वसूल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2020 00:40 IST

महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरून कारवाई होण्यापासून दूर रहावे व मनपास सहकार्य करावे यासाठी गुरुवारी (दि.२३) घरपट्टी व पाणीपट्टीमधील पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी सिडको भागात फिरून घरोघरी जाऊन कर भरण्यासाठी प्रबोधन केले.

ठळक मुद्देमनपा सिडको विभाग : कर भरण्यासाठी प्रबोधन

सिडको : महापालिकेच्या सिडको विभागीय कार्यालयाच्या वतीने घरपट्टी व पाणीपट्टी वसुली मोहीम सुरू असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मार्च अखेरपर्यंत दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी नागरिकांना स्मरणपत्र देण्यात आले आहे. तसेच जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरून कारवाई होण्यापासून दूर रहावे व मनपास सहकार्य करावेयासाठी गुरुवारी (दि.२३) घरपट्टी व पाणीपट्टीमधील पन्नासहून अधिक कर्मचाऱ्यांनी सिडको भागात फिरून घरोघरी जाऊन कर भरण्यासाठी प्रबोधन केले.मनपाच्या सिडको विभागीय कार्यालयास घरपट्टीचे ५१ कोटी व पाणीपट्टीचे २२ कोटी मिळून सुमारे ७३ कोटींचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यापैकी सोमवारी (दि.२०) पर्यंत घरपट्टीची २२ कोटी इतकी वसुली झाली असून, अजूनही २९ कोटी इतकी थकबाकी आहे, तर पाणीपट्टीची ११ कोटी इतकी वसुली झाली असून, अजूनही ११ कोटी थकबाकी आहे. घरपट्टी व पाणीपट्टीची अजूनही थकबाकी असल्याने नागरिकांनी थकबाकी भरण्यासाठी मनपाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे.ज्या करदात्यांनी अजूनही घरपट्टी व पाणीपट्टी भरलेली नाही अशा करदात्यांना मनपाच्या वतीने स्मरण पत्र तसेच नोटिसा बजावण्याचे काम सुरू आहे. थकबाकीदारांनी थकबाकी भरावी यासाठी मनपाच्या वतीने विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली गुरुवारी (दि.२३) घरपट्टी व पाणीपट्टी विभागातील कर्मचाºयांच्या वतीने सिडको भागातून रॅली काढण्यात आली.सहकार्य करण्याचे आवाहनमनपाच्या वतीने १६ डिसेंबरपासून अभय योजनेच्या माध्यमातून करामध्ये सूट देण्याबाबत नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. याचा अनेक करदात्यांनी लाभ घेतला असून, या योजनेत ३१ जानेवारी २०२० पर्यंत ७५ टक्के शास्ती सूट तर १ फेब्रवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीत ५० टक्के शास्ती सूट देण्यात आली असल्याने ज्या नागरिकांनी कर भरलेला नाही त्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा व मनपास सहकार्य करावे, असे आवाहन विभागीय अधिकारी सोमनाथ वाडेकर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

टॅग्स :nmmcनवी मुंबई महापालिका