शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकचा स्मार्ट सिटीअंतर्गत सुमारे २३० कोटीचा ‘गोदा प्रकल्प’ फसवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 19:16 IST

शाहू खैरे : विकासाचे चित्र आभासी असल्याचा दावा

ठळक मुद्दे ‘गोदा प्रकल्प’च्या भवितव्याबाबत खैरे यांनी व्यक्त केली चिंताआयुक्तांसह अधिकाºयांची मानसिकताच दिसत नसल्याचा आरोप

नाशिक : नाशिक म्युनिसिपल स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या वतीने स्मार्ट सिटी अंतर्गत सुमारे २३० कोटी रुपये खर्चून साकारण्यात येणारा ‘गोदा प्रकल्प’ फसवा आणि आभासी असल्याचा दावा कॉँग्रेसचे गटनेता शाहू खैरे यांनी केला आहे. गोदापार्कची एकूणच लागलेली वाट पाहता ‘गोदा प्रकल्प’च्या भवितव्याबाबतही खैरे यांनी चिंता व्यक्त केली आहे.गुरुवारी स्मार्ट सिटी कंपनीच्या बैठकीत २३० कोटी रुपयांच्या ‘गोदा प्रकल्प’ला मान्यता देण्यात आली. रेट्रोफिटिंग आणि ग्रीनफिल्ड या दोन प्रकारांत दोन टप्प्यात होणाऱ्या  या प्रकल्पात १८ कामे केली जाणार आहेत. या प्रकल्पाबाबत पत्रकारांशी बोलताना शाहू खैरे यांनी सांगितले, वास्तविक स्मार्ट सिटी अंतर्गत नेमकी कोणती कामे केली पाहिजे, याची समजच संबंधित अधिकाऱ्याना नाही. ‘गोदा प्रकल्प’ हा असाच आभासी आणि स्वप्नवत असा प्रकल्प आहे. या प्रकल्पांतर्गत काही चांगली कामे होतील. परंतु, बरीचशी कामे ही फसवी आहेत. जलवाहतुकीचा प्रस्ताव तर हास्यास्पद आहे. मुळात होळकर पूल ते टाळकुटेश्वर पुलापर्यंतच्या गोदाघाट परिसराच्या विकासाकडे अधिक लक्ष केंद्रित केले पाहिजे. रामसेतू आणि गाडगे महाराज पूल या दोन्ही पुलांची मुदत संपलेली आहे. या पुलांच्या पुनर्विकासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. गोदाघाटावर व्यवसाय करणाऱ्या  व्यावसायिकांना पर्यायी जागा उपलब्ध करून देऊन घाट मोकळा केला पाहिजे. दशक्रियाविधीकरिता पिंडदानासाठी सुविधा उपलब्ध झाली पाहिजे. मूलभूत गोष्टींकडे लक्षच दिलेले नाही. वास्तविक स्मार्ट सिटी अंतर्गत गोदावरी परिसराचा विकास करताना परिसरातील लोकप्रतिनिधी, नागरिकांना विश्वासात घेतले पाहिजे. परंतु, कोणीही त्याबाबत विचारणा केलेली नाही. कालिदास कलामंदिरसह महात्मा फुले कलादालनाच्या कामांबाबत सूचना करूनही त्याबाबत कार्यवाही सुरू केलेली दिसत नाही. आयुक्तांसह अधिकाऱ्याची मानसिकताच दिसत नसल्याचा आरोपही खैरे यांनी केला आहे.नियमबाह्य कामकाजएसपीव्हीवर संचालकपदी कॉँग्रेसपक्षाकडून माझी निवड झालेली आहे. परंतु, महासभेने विसंगत ठराव मंजूर केलेला आहे. एसपीव्ही स्थापन होऊन १३ महिन्यांचा कालावधी लोटला तरी संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली नाही. सत्ताधारी पक्षाकडून मनमानी कारभार सुरू असून, उर्वरित पक्षांच्या संचालकांची नेमणूक करण्यास टाळाटाळ केली जात आहे. जोपर्यंत इतर पक्षांच्या उतरत्या क्रमानुसार संचालकांची नियुक्ती होत नाही तोपर्यंत कंपनीची बैठक घेऊ नये. बैठक घेऊन होणारे कामकाज हे नियमबाह्य असल्याचे शाहू खैरे यांनी म्हटले आहे. तसे पत्रही त्यांनी कंपनीचे अध्यक्ष सीताराम कुंटे यांना दिले आहे.