शहरं
Join us  
Trending Stories
1
RBI MPC Meeting Update: रेपो दर 'जैसे थे'; जागतिक अनिश्चिततेदरम्यान रिझर्व्ह बँकेचा सावध पवित्रा
2
शहबाज शरीफ यांना डच्चू! ट्रम्प यांनी या दोन जणांना केले कॉल? वाचा युद्धविरामापूर्वीच्या फोन कॉलची संपूर्ण 'इनसाईड स्टोरी'
3
शस्त्रसंधी केली तरी ट्रम्प यांची खुर्ची धोक्यात? ८५ खासदारांनी मागितला राजीनामा; विरोध कायम
4
वैभव-यशस्वीने मुंबईला धू धू धुतले, कॅप्टन हार्दिक पांड्याने ‘या’ खेळांडूंवर पराभवाचे खापर फोडले  
5
अमेरिका-इराणमध्ये अखेर तह! ट्रम्प कडाडले, पाकिस्तानने मध्यस्थी केली की चीनने? वाचा काय घडलंय...
6
युद्ध थांबलं, सोनं चांदी महागली; Silver मध्ये ११,५६० रुपयांची तर Gold ३,०२७ रुपयांची तेजी; पाहा १८ ते २४ कॅरेटचे दर
7
ट्रम्प झुकले, इराणसमोर सरेंडर केले, युद्धविरामावरून सिनेटर भडकले, अमेरिकेत संतापाची लाट
8
इथे युद्ध थांबलं, तिथे शेअर बाजार सुस्साट... Sensex २६०० अंकांनी वधारला, Nifty मध्ये ७०० अंकांची तेजी
9
अग्रलेख: भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी एकत्र आलेली 'महाविकास आघाडी' संपुष्टात?
10
“शस्त्रसंधी वगैरे काही नाही”; इस्रायलने केले स्पष्ट, अमेरिका-इराण युद्ध खरेच थांबणार का?
11
अमेरिकेने रोखली क्षेपणास्त्रे, इराणही भूमिकेवर ठाम, अखेर ‘या’ देशाची एंट्री, अन् झाला युद्धविराम
12
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
13
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
14
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
15
भंडाऱ्यात चोरांचे तांडव! ५ तासांत २१ दुकाने फोडली; लाखोंचा मुद्देमाल गायब, टोळी असल्याचा संशय
16
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
17
रवींद्र एरंडेच्या ऑफिसमध्ये धनादेशांचा खच; वाचवण्यासाठी अहिल्यानगरच्या 'त्या' नेत्यांचा पोलिसांवर दबाव
18
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
19
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
20
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
Daily Top 2Weekly Top 5

अस्थिविसर्जनाचा कलश बॅँकेत ठेवून करणार अभिनव आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 14:16 IST

घोटी: जिल्हा बँकेच्या वाडीव-हे शाखेतून वडिलांच्या नावावर असलेली हक्काची रक्कम जिवंतपणी तर नाहीच पण त्यांच्या मृत्यूनंतरही मिळत नसल्याने मुलाने अस्थिविसर्जनाचा कलश बँकेत ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.

पोलिसात तक्रार : जिल्हा बॅँकेच्या वाडीव-हे शाखेतून पैसे परत मिळत नसल्याची तक्रार

घोटी: जिल्हा बँकेच्या वाडीव-हे शाखेतून वडिलांच्या नावावर असलेली हक्काची रक्कम जिवंतपणी तर नाहीच पण त्यांच्या मृत्यूनंतरही मिळत नसल्याने मुलाने अस्थिविसर्जनाचा कलश बँकेत ठेवून आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.नाशिक जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या वाडीव-हे येथील बचत खात्यातील लाखो रूपयांची अडकलेली रक्कम परत मिळत नाही. रक्कम मिळण्यासाठी जिवंतपणी प्रयत्न करूनही रक्कम मात्र मिळाली नाही. शेवटी खातेदाराच्या दशक्रि या विधीसाठी सुद्धा हक्काची रक्कम मिळाली नाही. परिणामी बँकेच्या विरोधात वाडीवर्हे येथील एकनाथ मूर्तडक यांनी पोलिसांकडे तक्र ार केली आहे. वडिलांचे अस्थीविसर्जन न करता बँकेच्या शाखेत अस्थीकलश ठेवून अभिनव आंदोलन करणार असल्याचे सांगण्यात आले.नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सध्या विविध विषयांमुळे चर्चेत असते. नोटाबंदीमुळे मोठ्या विश्वासाने आपल्या ठेवी बँकेत ठेवलेल्या ग्रामीण ठेवीदारांनी हक्काची रक्कम मिळावी म्हणून यासाठी बँकेकडे तगादे लावलेले आहेत. वाडीवºहे येथील एकनाथ मूर्तडक यांची स्थिती काही वेगळी नाही. त्यांचे वडील बाबुराव मूर्तडक यांनी वर्षभरापासुन बँकेच्या वाडीवºहे शाखेत आपल्या बचत खात्यातील लाखो रूपयांची रक्कम मिळावी प्रयत्न केले होते. आजारपणावरील उपचारासाठी त्यांना पैशांची अत्यंत गरज होती. वारंवार चकरा मारून आणि अर्जफाटे करूनही त्यांना स्वत:ची रक्कम मिळाली नाही. दहा दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला. किमानदशक्रि या विधीसाठी तरी रक्कम द्या अशी एकनाथ मुर्तडक यांची अपेक्षा फोल ठरली. म्हणून मुर्तडक यांनी वडिलांचे अस्थी विसर्जन न करता बँकेत ठेवून अभिनव आंदोलन करणार असल्याचे सांगितले. यासह त्यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालक, विभागीय अधिकारी, शाखाधिकारी यांच्या विरोधात वाडीव-हे पोलिसांकडे तक्र ार दिली आहे.----------------वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सूचनेनुसार एका खातेदाराला पाच हजारांपेक्षा जास्त रक्कम देता येत नाही. मुर्तडक यांनाही हेच यापूर्वी लेखी स्वरूपात लिहून दिलेले आहे.- विलास आहेर, शाखाधिकारी, वाडिव-हे

टॅग्स :Nashikनाशिक