शहरं
Join us  
Trending Stories
1
एपीआयला हिरो व्हायचं होतं म्हणून रोहित आर्याच्या छातीत गोळी झाडली; अ‍ॅडव्होकेट नितीन सातपुतेंचा आरोप
2
Deepak Kesarkar : "...तर मी जीवाची पर्वा न करता तिथे गेलो असतो"; रोहित आर्याबद्दल काय म्हणाले दीपक केसरकर?
3
टीम इंडियाचे माजी कर्णधार अझरुद्दीन यांची नवी इनिंग; घेतली तेलंगणाच्या मंत्रिपदाची शपथ
4
शरद पवारांच्या मुंबईतील बैठकीला भाजप कार्यकर्त्यालाच पाठविले? फोटो समोर आल्याने उडाली खळबळ...
5
रोहित आर्यामुळे मुंबई हादरली! यामीच्या सिनेमातील कथेसारखं सेम टू सेम किडनॅपिंग, तुम्ही पाहिलाय का 'तो' चित्रपट?
6
शुभमंगल सावधान !! स्मृती मंधनाच्या लग्नाची तारीख ठरली; 'या' दिवशी सांगलीत रंगणार लग्नसोहळा
7
युक्रेन युद्ध थांबवण्याच्या प्रयत्नांना मोठा धक्का! रशियाच्या 'या' अटी व्हाईट हाऊसला मान्य नाहीत
8
शेतकऱ्यांना 3000 रुपये, पाटण्याजवळ नवं शहर अन्...; बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'संकल्प पत्रात' NDA नं दिली मोठी आश्वासनं
9
'टॅरिफ वॉर'दरम्यान अमेरिकेने बदलला आपला सूर, भारतासोबत केला एक मोठा संरक्षण करार...
10
विराटनं केलं भारतीय महिला संघाचं कौतुक,ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या विजयानंतर  म्हणाला...
11
आईचं स्वप्न साकार, संघर्षातून लेक बनली IAS; पण मुलीचं यश पाहण्याआधीच आईनं घेतला जगाचा निरोप
12
....तोपर्यंत तपास यंत्रणा वकिलांना समन्स बजावू शकत नाहीत; सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
13
आता उगाच उठून सोशल मीडियावर काहीही बोलता येणार नाही! 'या' देशाने इन्फ्लुएन्सर्सबाबतीत घेतला मोठा निर्णय
14
पाकिस्तानला मोठा झटका देण्याच्या तयारीत अफगाणिस्तान, करणार तगडा प्रहार; भारतही देणार साथ!
15
कार्तिकी एकादशी २०२५: १ नोव्हेंबरला एकादशी तिथी प्रारंभ; पण उपास नेमका कधी? वाचा अचूक माहिती
16
खिशाला कात्री! स्मार्टफोन महाग होणार? AI मुळे तुम्हाला आता जास्त पैसे मोजावे लागणार
17
₹25,88,50,70,00,000 स्वाहा, मार्क झुकरबर्ग यांनी संपूर्ण वर्षात जेवढं कमावलं, त्याहून अधिक एका दिवसात गमावलं!
18
१ कोटी रुपयांचं घर घेण्यासाठी तुमची मिनिमम सॅलरी किती असली पाहिजे? पाहा काय म्हणताहेत एक्सपर्ट्स
19
'काँग्रेसमुळे जम्मू-काश्मीरचा एक भाग पाकिस्तानात गेला', पंतप्रधान मोदींचा घणाघात...
20
Shri Swami Samartha: घरातील देवांची मूर्ती, प्रतिमा यातील चैतन्य कसे ओळखावे? उपासना कशी वाढवावी? वाचा

संस्थेसाठी त्याग करा !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2020 00:33 IST

कुटुंब आणि गाव हे एक म्हणून कुंदेवाडी हे आदर्श गाव आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या गावातील मविप्र संस्थेची शाळा आज ५० वर्षं पूर्ण करते ही मी गावचा या नात्याने अभिमानाची असून, माजी विद्यार्थ्यांनी संस्था ही आपली आई आहे याची जाणीव ठेवून त्यागाची भावना ठेवावी आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले.

ठळक मुद्देविनायकदादा पाटील : कुंदेवाडी शाळेचा सुवर्णमहोत्सव

निफाड : कुटुंब आणि गाव हे एक म्हणून कुंदेवाडी हे आदर्श गाव आहे. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या या गावातील मविप्र संस्थेची शाळा आज ५० वर्षं पूर्ण करते ही मी गावचा या नात्याने अभिमानाची असून, माजी विद्यार्थ्यांनी संस्था ही आपली आई आहे याची जाणीव ठेवून त्यागाची भावना ठेवावी आवाहन माजी मंत्री विनायकदादा पाटील यांनी केले.कुंदेवाडी, ता. निफाड येथील स्वामी विवेकानंद माध्यमिक विद्यालयाच्या सुवर्णमहोत्सव वर्षानिमित्त माजी विद्यार्थी मेळावा कार्यक्र मात ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर मविप्रच्या सरचिटणीस नीलिमा पवार, जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब क्षीरसागर, चिटणीस सुनील ढिकले, सभापती माणिकराव बोरस्ते, सुरेशबाबा पाटील, रायभान काळे, सचिन पिंगळे, राघो आहिरे, भाऊसाहेब खताळे, प्रशांत देवरे, विश्राम निकम, विश्वास मोरे, नानासाहेब दाते, नंदा सोनवणे, शिक्षणाधिकारी डी. डी. काजळे, एस. के. शिंदे, शिवाजी भालेराव, मुख्याध्यापक एम.टी. पाटील आदी मान्यवर होते.यावेळी विनायकदादा पाटील यांनी १९५२ साली कुंदेवाडी येथून कोलंबोला कांदा एक्स्पोर्ट होत असल्याची माहिती दिली.कृषी संशोधन केंद्र, वीज केंद्र, रेल्वे स्टेशन, माध्यमिक शाळा अशा अनेक मोठ्या संस्था गावात उभ्या राहिल्या त्यात या गावच्या लोकांचा त्याग असल्याची आठवण करून देत ज्या ठिकाणी बोट क्लब सुरू होतोय तिथे पूर्वी डोह होता आणि त्यात मगरी असल्याची जुनी माहिती दिली. यावेळी शाळेने सुवर्णमहोत्सवा-निमित्त काढलेल्या स्वामी या स्मरणिकेचे प्रकाशन व कादवा नदीतील बोट क्लबच्या शुभारंभाचा कार्यक्रम झाला. स्वागताध्यक्ष संचालक प्रल्हाद गडाख यांनी प्रास्ताविक केले. नीलिमा पवार, सभापती माणिकराव बोरस्ते तसेच नंदू गायकवाड, रावसाहेब घेगडे, सीमा पाटील या माजी विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले. सरपंच विनोद मोरे, वैकुंठ पाटील, कांतिलाल अलिझाड, सुनील शिंदे, अभय बलदोटा, अशोक शिंदे, माधव गिते, संदीप शिंदे, योगेश शिंदे, सुनील घेगडे, प्रभाकर वाघ, शिवाजी ढेपले, अविनाश पवार, जानकीराम धारराव यांच्यासह माजी विद्यार्थी, ग्रामस्थ आदी उपस्थित होते. गेल्या दोन महिन्यांपासून या मेळाव्याची तयारी सुरू होती. गेल्या ५० वर्षातील शाळेचे माजी विद्यार्थी एकत्र आले होते. त्यामुळे शाळेच्या प्रांगणात एकमेकांना अनेक वर्षांनी भेटलेले मित्रमैत्रिणी गप्पामध्ये रंगले होते. या कार्यक्र मानिमित्ताने आलेल्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला देणगी म्हणून एका दिवसात ९८ हजार रु पये जमा झाले.

टॅग्स :Education Sectorशिक्षण क्षेत्रStudentविद्यार्थी