शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ मृत व्यक्तीचे आधार कार्डही बोगस!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2020 01:48 IST

नांदगाव : १९ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट दस्तावेज बनवून, मृत व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जोडीला बनावट आधार कार्ड बनवून देणारी तहसील कार्यालयातील टोळी अस्तित्वात असल्याचा पुरावा या निमित्ताने उपलब्ध झाला आहे. यामुळे दुय्यम निबंधक विभागातील अधिकारी, सिटी सर्व्हे अधिकारी, खरेदी करून देणारे-घेणारे हे सगळे चौकशीच्या भोवºयात आले आहेत.

ठळक मुद्देनांदगाव दस्तावेज प्रकरण : दुय्यम निबंधकसह सिटी सर्व्हे कार्यालय वादाच्या भोवऱ्यात

लोकमत न्यूज नेटवर्कनांदगाव : १९ वर्षांपूर्वी मृत झालेल्या व्यक्तीच्या नावाने बनावट दस्तावेज बनवून, मृत व्यक्तीकडून मालमत्ता खरेदी केल्याच्या गंभीर प्रकरणात दुय्यम निबंधक कार्यालयाच्या जोडीला बनावट आधार कार्ड बनवून देणारी तहसील कार्यालयातील टोळी अस्तित्वात असल्याचा पुरावा या निमित्ताने उपलब्ध झाला आहे. यामुळे दुय्यम निबंधक विभागातील अधिकारी, सिटी सर्व्हे अधिकारी, खरेदी करून देणारे-घेणारे हे सगळे चौकशीच्या भोवºयात आले आहेत.तहसील कार्यालयात दलालांची टोळी? विठ्ठल साखरचंद मोरे (मृत्यू २००१) यांचा मुलगा पंडित विठ्ठल मोरे याला विठ्ठल मोरे बनवल्याचे आधार कार्डवरून स्पष्ट होते. हे बनावट आधार कार्ड वापरून सन २०१९ मध्ये जमीन कल्पना कैलास बावणे यांना विकण्यात आली. अनेक पुरावे आणून दिले व तहसीलमध्ये वारंवार चकरा मारल्या तरी आधार कार्ड मिळत नाही. कारण कार्डचे दर ठरलेले असतात याची उदाहरणामुळे पुष्टी मिळाली आहे. तसेच या कार्यालयात दलालांची टोळी सक्रि य असल्याच्या चर्चेला बळ मिळाले आहे. या व्यवहारात साक्षीदार म्हणून असलेल्या व्यक्तीच्या सह्या उपरोल्लिखित शासकीय कार्यालयातील अनेक दस्तावेजात आढळून येत असतील तर त्यामागची कारणे व परिस्थिती यांचा शोध घेतल्यास सत्य उजेडात येण्याची अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे. एरवी नगर भूमापन कार्यालयात चकरा मारल्याशिवाय एकही कागद पुढे सरकत नाही. प्रस्तुत प्रकरणात सिटी सर्व्हेला नोंद देखील पटकन झालेली आढळून येते. तहसील कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय असो की नगर भूमापन कार्यालय या कार्यालयांच्या अधिकारीवर्गावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने घातलेल्या धाडीच्या नोंदी चाळल्या तरी पुरेसे व्हावे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAdhar Cardआधार कार्ड