चांदोरी : महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या प्राथमिक प्रमाणिकीकरणाचा प्रारंभ निफाड तालुक्यातील चांदोरी गावात करण्यात आला. या गावातील ४८५ पात्र शेतकऱ्यांची यादी पोर्टलवर प्रसिद्ध करण्यात आली आहे.महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेंतर्गत चांदोरी, ता. निफाड येथील थकबाकीदार शेतकरी सभासदांचे आधार प्रमाणिकीकरण करून या योजनेचा शुभारंभ जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांच्या हस्ते जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत करण्यात आला. याप्रसंगी सहायक निबंधक अभिजित देशपांडे, एस. पी. रु द्राक्ष, बी. डी. लिलके आदी उपस्थित होते. चांदोरी गावातील शेतकऱ्यांचे आधार प्रमाणिकीकरणाचे काम युद्धपातळीवर करण्यात आले. आधार प्रमाणिकीकरण नोंदणीचे काम करण्यात येत आहे. ज्या शेतकºयांचे आज आधार प्रमाणिकीकरण केले त्या शेतकºयांना पुरावा म्हणून छापील पावती देण्यात येत असून, मोबाइलवर कर्जमाफीची कार्यवाही सुरू झाल्याचे एसएमएस येत असल्याची माहिती बलसाणे यांनी दिली.
चांदोरी येथे आधार प्रमाणिकीकरणास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2020 00:16 IST