शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमीष दाखवत डॉक्टर महिलेवर नाशकात बलात्कार

By अझहर शेख | Updated: October 21, 2023 15:40 IST

पीडित फिर्यादी महिला व संशयित संदीप यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली.

नाशिक : इन्स्टाग्रामवरून ओळख करत वेळोवेळी संपर्कात राहून मैत्री व प्रेमाचा बनाव केला अन् लग्नाचे आमीष दाखवून बळजबरीने शरिरसंबंध ठेवत अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पिडित डॉक्टर महिलेने इंदिरानगर पोलिस ठाण्यात धाव घेत आपबिती सांगितल्यानंतर पोलिसांनी पिडितेच्या फिर्यादीनुसार भाजपचे माजी नगरसेवक भगवान दोंदे यांचा मुलगा संशयित संदीप भगवान दोंदे यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.

पीडित फिर्यादी महिला व संशयित संदीप यांच्यामध्ये जानेवारी महिन्यात इन्स्टाग्रामद्वारे ओळख झाली. या ओळखीचे रूपांतर पुढे मैत्रीत अन् प्रेमात झाले. त्यानंतर संशयित हा पिडितेला भेटण्यासाठी भेटण्यासाठी तिच्या घरी ये-जा करू लागला. यावेळी ‘माझे तुझ्यावर खुप प्रेम आहे, आपण विवाह करू...’ असे सांगून विश्वास संपादन केला. यानंतर पिडितेने त्यास आई-वडिलांना त्यांच्या नात्याची माहिती देण्यास सांगितले. दरम्यान, संशयित संदीप याने एकेदिवशी पिडितेच्या घरी येऊन तिच्याशी जवळीक साधून बळजबरीने शरिरसंबंध प्रस्थापित केले.

यावेळी पिडितेने त्यास विरोध दर्शवित ‘आपले लग्न अजून झालेले नाही, शरीरसंबंध ठेवू नको...’ असा आक्षेप घेतला. यावेळी संशयिताने आपण लग्न करणारच आहोत, काहीही होत नाही, असे सांगुन शरिरसंबंध ठेवले. यामुळे ऑगस्ट महिन्यात पिडितीला गर्भवती असल्याचे तिच्या लक्षात आले. तिने तातडीने याबाबत संशयिताला कल्पना दिली असता त्याने ‘सध्या आपल्याला बाळ ठेवता येणार नाही...’ असे सांगून गर्भपाताच्या गोळ्या आणून देत त्या सेवन करण्यास सांगितले. यामुळे गर्भपात झाल्याचे पिडितेने फिर्यादीत म्हटले आहे.

त्यानंतर पुन्हा असाच प्रकार संशयिताने शरिरसंबंध केल्याने घडला अन् पिडिता चार महिन्यांची दुसऱ्यांदा गर्भवती झाल्याचे ऑक्टोबरमध्ये लक्षात आले. यानंतर तिने पुन्हा संशयितास सांगितले असता, त्याने ‘तुझ्याशी माझा काही संबंध नाही, मी तुला लग्नाचे आश्वासन दिलेले नाही सांगून तुझे परिसरात राहणे अवघड करू अशाप्रकारे दम भरला, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संशयित संदीपविरूद्ध बलात्कारासह गर्भपातास भाग पाडल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास महिला पोलीस उपनिरिक्षक मनीषा शिंदे करीत आहेत.