शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

शहीद पतीचे स्वप्न सत्यात उतरविणे हेच ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’; वीरपत्नी यशोदा गोसावी यांची भावना

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2022 09:42 IST

लग्नाला चार वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच नियतीने गाठी तोडल्या. १७ नोव्हेंबर, २०१८ रोजी अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीचे भूमिपुत्र मराठा बटालियनचे वीर जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले होते 

अझहर शेख नाशिक : लग्नाला चार वर्षे होत नाहीत, तोच नियतीने पतीची साथ कायमची हिरावून घेतली. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबतच्या चकमकीत मराठा बटालियनचे वीर जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले. त्यांच्या वीरपत्नी यशोदा यांनी स्वत:ला सावरले आणि पती केशव यांची अर्धवट राहिलेली स्वप्ने साकारण्यासाठी धैर्य व जिद्दीने वाटचाल सुरू ठेवली आहे. पतीची स्वप्नं सत्यात उतरविणं, हेच माझं त्यांच्यासाठी ‘व्हॅलेंटाइन गिफ्ट’ असेल, अशी भावना यशोदा यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.

लग्नाला चार वर्षे पूर्ण होत नाहीत, तोच नियतीने गाठी तोडल्या. १७ नोव्हेंबर, २०१८ रोजी अतिरेक्यांना प्रत्युत्तर देताना सिन्नर तालुक्यातील शिंदेवाडीचे भूमिपुत्र मराठा बटालियनचे वीर जवान केशव सोमगीर गोसावी शहीद झाले होते. यशोदा यांंनी पतीला तर सोमगीर गोसावी यांनी एकुलत्या मुलाला आणि बहिणीने भावाला कायमचे गमावले. मात्र, ‘काव्या’च्या जन्माने गोसावी कुटुंबामध्ये नवी उमेद आली.

सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्नपत्नी व मुलांनी उच्चशिक्षण घ्यावे, असे केशव यांचे स्वप्न होते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी यशोदा यांनी दहावीनंतर थांबलेल्या शिक्षण पुन्हा सुरू केले. त्या स्वत: कला शाखेतून पदवीच्या दुसऱ्या वर्षाचे शिक्षण घेत आहेत. काव्यालाही उच्चशिक्षण देत, सैन्यदलात अधिकारी म्हणून बघायचे आहे, यासाठीच गावातून शहरात वास्तव्याला आल्याचे यशोदा यांनी सांगितले. पदवी पूर्ण झाल्यानंतर त्याही सैन्यात भरती होण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.

व्यर्थ न हो बलिदानमाझे पती २०१८ साली शहीद झाले. १४ फेब्रुवारी, २०१९ रोजी पुलवामामध्ये भ्याड दहशतवादी हल्ला झाला. त्यामुळे ‘व्हॅलेंटाइन डे’ हा एक प्रकारचा ‘ब्लॅक डे’ आहे. या हल्ल्यात शहीद झालेल्या सैनिकांचे स्मरण प्रत्येक भारतीयाने या दिवशी करत त्यांना श्रद्धांजली अर्पण करावी, हेच एक वीरपत्नी या नात्याने मी सांगू इच्छिते. सीमेवर कर्तव्य बजावणारे सैनिक अन् त्यांची प्रतीक्षा करत, इच्छा, आकांक्षांचा त्याग करणारे त्यांचे कुटुंबीय, यामुळेच आपण सर्व सण, उत्सव आनंदाने साजरे करू शकतो, याची जाणीव  ठेवायला हवी. - यशोदा गोसावी, वीरपत्नी.

टॅग्स :Valentine Dayव्हॅलेंटाईन्स डे