शहरं
Join us  
Trending Stories
1
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
2
लंडनला जाण्यासाठी आधी १९ जूनचं होतं बुकिंग; पतीच्या बर्थडेसाठी प्लॅन बदलला, १२ जूनचं तिकिट काढलं
3
Israel Strike on Iran: इस्रायलचे इराणवर हल्ले! डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, 'त्यांना आधीच सांगितलं होतं की...'
4
लग्न करताय? 'हा' विमा असेल तर टेन्शन फ्री व्हाल! जाणून घ्या 'वेडिंग इन्शुरन्स'चे फायदे!
5
पतीसमोरच बायकोला प्रियकराकडे पाठवले, अट मात्र धक्कादायक! पंचायतीच्या निर्णयाने सगळेच झाले अवाक्
6
महिन्याला ३० हजार कमावणारेही होऊ शकतात कोट्याधीश, 'अशी' करू शकता गुंतवणूक
7
VIDEO : अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मोठा चमत्कार...! विमानाचे धातूही वितळले, पण 'या' धर्मग्रंथाला साधा स्पर्षही करू शकली नाही आग!
8
Black Box: अहमदाबाद विमान अपघाताचे कारण समोर येणार; ब्लॅक बॉक्स आणि व्हॉईस रेकॉर्डर सापडले
9
'कॉन्फिगरेशन एरर'मुळे २४१ लोकांचा मृत्यू ?; अहमदाबाद विमान अपघातामागील हे मोठे कारण असू शकते
10
MLC 2025: भारतीय फलंदाजाचा धुमधडाका! चार चेंडूत मारले चार षटकार, केली तुफान फटकेबाजी
11
राजाच्या हत्येनंतर आणखी एक टार्गेट, ज्याची हत्या करणार होती सोनम रघुवंशी; राज कुशवाहचा नवा खुलासा
12
Air India Plane Crash: बोइंग विमानांचे ६ हजाराहून अधिक अपघात, तरीही १५० देश का खरेदी करतात?; इंजिनिअरचा खुलासा
13
Gold Price 13 June: १ लाखांच्या पार पोहोचला सोन्याचा दर; Israel-Iran संघर्षामुळे वाढल्या किंमती, पाहा लेटेस्ट रेट्स
14
बोइंगने घेतलेले शॉर्टकट पडले महागात, ड्रीमलाइनरवरील संशय वाढला; अमेरिकी माध्यमांत होतेय कंपनीच्या त्रुटींवर चर्चा; यापूर्वी देण्यात आले होते चौकशीचे आदेश
15
आमची मुलगी सोनमपेक्षा कमी नाही! जावयाच्या जीवाची भीती व्यक्त करत आईनेच गाठलं पोलीस स्टेशन! म्हणाली... 
16
Ahmedabad Plane Crash: त्यावेळी नेमकं काय घडलं असावं?
17
Viral Video: समुद्रकिनाऱ्यावर तरुणी काढत होती सेल्फी, तितक्यात मोठी लाट आली अन्...; व्हिडीओ व्हायरल
18
Accident: अग्निशामक दलाच्या गाडीने सहा जणांना चिरडले, बाप-लेकासह तिघे जागीच ठार, लेक वाचली
19
सांगलीतील लाच प्रकरणी आयएएस अधिकारी शुभम गुप्तांच्या अडचणी वाढल्या; आणखी कारनामे उघडकीस
20
एअर इंडियाच्या विमानाला अपघात का झाला? कारण ६ महिन्यांनी कळणार

हरविलेल्या बालिकेचा ‘गुगल’ने घेतला शाेध; त्यानंतर लैंगिक अत्याचाराचा झाला पर्दाफाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 15:50 IST

नाशिक- नाशिकमध्ये एका मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित चिमुकली शनिवारी रात्री जेलरोड येथील तिच्या राहत्या घरातून वडिलांसोबत ...

नाशिक- नाशिकमध्ये एका मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित चिमुकली शनिवारी रात्री जेलरोड येथील तिच्या राहत्या घरातून वडिलांसोबत फिरण्यासाठी गेली होती. वडील श्वानाला एका गार्डनमध्ये फिरवीत असताना चिमुकलीने पुन्हा तेथून घराच्या दिशेने पळ काढला. यामुळे वडिलांना वाटले की मुलगी घराकडे गेली. मात्र, वाटेतच संशयिताने तिला फूस लावून वडिलांजवळ सोडण्याचे आमीष दाखवून शारीरिक अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला, अशी माहिती पोलिसांनी दिली.

वडील जेव्हा पाळीव श्वानाला घरी घेऊन आले, तेव्हा त्यांनी मुलीबाबत विचारणा केली असता पत्नीने ती घरी आली नसल्याचे सांगितले. यानंतर या दाम्पत्याने मुलीचा परिसरात शोध घेण्यास सुरुवात केली. ती यावेळी घाबरलेली असल्याने तिने कोणाला काहीही सांगितले नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. उपनगर पोलिसांनी संशयित आरोपी चेतन डोळस (वय २५) यास बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलीच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून संशयिताविरुद्ध बलात्कार, बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियमांतर्गत (पॉस्को) गुन्हा दाखल केला आहे.

रहिवासीही बालिकेच्या शोधार्थ

आजूबाजूचे लोकदेखील बालिकेच्या शोधासाठी धावले. रात्रीच्या काळोखात सर्वत्र चिमुकलीचा शाेध सुरू झाला. याबाबत तत्काळ पोलिसांना रहिवाशांनी माहिती कळविली. नाशिकरोड, उपनगर पोलिसांची गस्ती पथके घटनास्थळी दाखल झाली. तत्काळ बिनतारी संदेश यंत्रणेवरून माहिती व बेपत्ता मुलीचे वर्णन कळविण्यात आले. रात्री उशिरा चिमुकलीचा शोध घेण्यात पोलिसांना श्वानाच्या मदतीने यश आले.

...अन् ‘गुगल’ धावत सुटला

पोलिसांनी उशिरापर्यंत बेपत्ता बालिकेचा शोध घेतला. मात्र, ती आढळून न आल्याने गांभीर्य ओळखून अखेर उपनगर पोलिसांनी बॉम्ब शोधक-नाशक पथकाला पाचारण केले. ‘गुगल’ श्वानाने घटनास्थळी पोहोचून चिमुकलीचे दुसरे कपडे हुंगले आणि धावतच सुटला. श्वानाने दाखविलेल्या मार्गाने पोलीसही धावू लागले. यावेळी वाटेत चिमुकली अंधारात एकटीच चालत येत असल्याचे पोलिसांच्या नजरेस पडली.