शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
3
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
4
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
5
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
6
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
7
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
8
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
9
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
10
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
11
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
12
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
13
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
14
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
15
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
16
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
17
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
18
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
19
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
20
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक

नाशिकच्या रामेश्वर नगरात बिबट्या आला अन्  फेरफटका लागवून गेला;सीसीटीव्हीत कैद 

By अझहर शेख | Updated: December 13, 2023 12:19 IST

वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला बिबट्या गंगापुररोडभागातील लोकवस्तीत दिसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली.

नाशिक : गंगापुररोडवरील पाइपलाइन रोड, रामेश्वरनगर भागात बिबट्याचे दर्शन झाल्याचा ‘कॉल’ वनविभागाला गंगापुर पोलिसांकडून मिळाला. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असता एका सीसीटीव्हीत बिबट्या कैद झाल्याचे दिसून आले. यामुळे सर्व लवाजम्यासह वनाधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. बुधवारी (दि.१३) सकाळी आठ वाजेपासून अकरा वाजेपर्यंत या संपुर्ण भागात बिबट्याचा शोध घेण्यात आला; मात्र कुठेही बिबट्या आढळून आला नाही.

वनविभागाच्या नाशिक वनपरिक्षेत्र कार्यालयाला बिबट्या गंगापुररोडभागातील लोकवस्तीत दिसल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. यानंतर वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गाडे यांनी वनपरिमंडळ अधिकारी अनिल अहिरराव, वनपाल उत्तम पाटील, वनरक्षक राजेंद्र ठाकरे, विजय पाटील, दिपक जगताप, सचिन आहेर, रोहिणी पाटील, मानद वन्यजीव रक्षक वैभव भोगले आदींचे पथक सज्ज करून घटनास्थळी पाठविण्यात आले. गंगापुररोडवरील आनंदवलीच्या पुढे रामेश्वरनगर, पाइपलाइन रोडवरील विविध भागात दाेन वनपथकांनी शोध मोहीम राबविली. रामेश्वरनगरमधील उद्यानाच्या पाठीमागे असलेल्या मोकळ्या जागेतील झाडीझुडुपाजवळ फटाके वाजविण्यात आले. जेणेकरून दडलेला बिबट्या बाहेर पडेल; मात्र तेथेही बिबट्या आढळून आला नाही. पाइपलाइन रोडवरील एका बंद पडलेल्या लॉन्समध्ये पाठीमागील बाजूस वाढलेल्या झाडीझुडुपात वनपथकाकडून शोधमोहिम घेण्यात आली. याठिकाणी एका भटक्या श्वानाचा फडशा पाडल्याचा पुरावा वनखात्याला मिळाला. तसेच रामेश्वरनगरातील केशर बंगल्याच्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

बचाव पथक सज्ज अन् अलर्ट!वनपरिक्षेत्र कार्यालयाचे वन्यजीव बचाव पथक लवाजम्यासह सज्ज आहे. रात्रीचे गस्तीपथकालाही ‘अलर्ट’वर ठेवण्यात आले आहे, अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी वृषाली गायकवाड यांनी दिली. नागरिकांनी अफवा पसरवू नये. बिबट्या जर खरोखर बघितला तरच त्याची माहिती कळवावी. कुठल्याही ऐकीव माहितीवरू विश्वास ठेवून सोशलमिडियावर मॅसेजेस किंवा जुने व्हिडिओ, फोटो व्हायरल करु नये, असे आवाहन गाडे यांनी केले आहे. 

टॅग्स :leopardबिबट्या