शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम व्यावसायिकाला पाच हजारांचा दंड; डेंग्यू उत्पत्ती स्थळांची महापालिकेकडून पाहणी

By suyog.joshi | Updated: December 13, 2023 10:26 IST

मनपाच्या आरोग्य विभागाने शिंगाडा तलावाच्या मागील बाजूस असलेले 'राज्य महामंडळाच्या बस डेपो' मध्ये भेट दिली असता त्यात काही त्रूटी आढळून आल्या.

नाशिक- शहरात वाढणाऱ्या डेंग्यू रूग्णसंख्येच्या पाश्व'भूमीवर महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला असून शहरात शिंगाडा तलाव परिसरात तपासणीदरम्यान डास उत्पत्ती ठिकाण आढळल्याने झुलेलाल कंपनीस पाच हजार रूपयांचा दंड ठोठावला. शहरात ठिकठिकाणी डेंग्यूच्या चाचण्याही केल्या जात आहेत. शहरात सुरू असलेल्या विविध बांधकाम साइट्सवरही ॲबेट नावाचे औषध टाकून डेंग्यूच्या डासअळी नष्ट करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आरोग्य विभागाच्या वतीने सांगण्यात आले.

पश्चिमच्या प्रभाग १३ मधील शिंगाडा तलाव परिसर, एन डी पटेल रोड, एसटी कार्यशाळा आगार क्रमांक एक एक या ठिकाणी नाशिक महानगरपालिकेचे जीवशास्त्रज्ञ. डॉ. नितीन रावते यांनी दैनंदिन कामकाजाची तपासणी करून परिसरात असलेल्या सर्व डास उत्पत्ती स्थळांची माहिती घेतली. डिव्हिजन एक येथील आगार प्रमुख श्री ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्या भागामध्ये असलेल्या डास उत्पत्ती स्थळाची माहिती दिली. 

पाण्याचा निचरा होत नाहीमनपाच्या आरोग्य विभागाने शिंगाडा तलावाच्या मागील बाजूस असलेले 'राज्य महामंडळाच्या बस डेपो' मध्ये भेट दिली असता त्यात काही त्रूटी आढळून आल्या. त्यात वाहने धुण्याच्या जागे जवळ पाणी साठून राहत आहे. त्या पाण्याचा निचरा होत नाही. साठून राहिलेले पाणी तेलमिश्रित असून देखील, त्यामध्ये सर्व स्टेजेस मधील डास उत्पत्ती स्थाने आढळून आली. परिसरात असलेल्या ड्रेनेज लाईनच्या टाक्यांचे ढापे उघडे आहेत ते झाकण्यात यावेत. परिसरामध्ये कचरा व गवत आढळून आले ,ज्यामुळे अस्वच्छता निर्माण होत आहे. तसेच कचऱ्यामध्ये असलेल्या प्लास्टिक फॉइल्समध्ये पाणी साठून त्यामध्ये देखील डास उत्पत्ती स्थाने आढळून आलेली आहेत. त्यामुळे सदर प्लास्टिकच्या कचऱ्याचा त्वरित नायनाट करण्यात यावा व भविष्यात असा कचरा गोळा होऊ नये यासाठी नियमित कार्यवाही करत राहावी अशा सुचना देण्यात आल्या. 

नागरिकांनी सतर्क राहावे. घराजवळ कोणतेही पाण्याचे डबके साचू देऊ नये. काही तक्रार असल्यास आरोग्य विभागाकडे कळवावी.-डॉ. नितीन रावते, मलेरिया विभाग प्रमुख