शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळी गावांतही जगली ९८ टक्के रोपे

By admin | Updated: January 28, 2017 01:10 IST

वृक्षलागवड अभियान : पर्जन्यराजाची वृक्षारोपणावर कृपा

नाशिक : राज्य शासनाच्या वतीने १ जुलै २०१६ रोजी दोन कोटी वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम राज्यभर राबविण्यात आला. नाशिक जिल्ह्यातही वनविभागासह इतर सर्व शासकीय कार्यालयाच्या वतीने सदर मोहीम राबविण्यात आली. परंतु यामध्ये सर्वात महत्त्वाचा भाग हा वनविभागाचा होता. या उपक्रमांतर्गत वनविभागाने मागीलवर्षी केलेल्या वृक्षारोपणाचा आढावा घेतला असता ६२ गावांमध्ये करण्यात आलेल्या वृक्षारोपणातील सुमारे ९८ टक्के वृक्ष जिवंत असल्याचे सर्वेक्षणांतर्गत समोर आले आहे. विशेष म्हणजे ९० टक्के गावे ही दुष्काळी आहेत. वनविभागाच्या वतीने वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून राज्यभर दोन कोटी वृक्षलागवड करण्याचा महत्त्वाकांक्षी कार्यक्रम गेल्या १ जुलै २०१६ रोजी राबविण्यात आला. यामध्ये शासनाच्या सर्व खात्यांनी सहभाग नोंदविला होता. वनविभागाच्या पूर्व विभागात सात दुष्काळी तालुक्यांतील ६२ गावांमध्ये वृक्षारोपण करण्याचे आणि लावलेली रोपे जगविण्याचे शिवधनुष्य वनविभागाने पेलले आहे. नियोजन, निगराणी आणि नियमावलीच्या त्रिसूत्रीतून वृक्षारोपणाचे संगोपन करण्यात आल्याने रोपांना संजीवनी मिळाली आहे. इगतपुरी, त्र्यंबकेश्वर, पेठ, सिन्नर, नाशिक, सुरगाणा आणि दिंडोरी यासारख्या आदिवासी आणि दुष्काळी भागातील दुर्गम क्षेत्रात वनविभागाने व्यापक वृक्षारोपण मोहीम राबविली होती. या मोहिमेत वनविभागाने ९ लाख ३७ हजार ७९ वृक्षांची लागवड केली होती. त्यामध्ये ९ लाख २५ हजार ९५१ इतकी रोपे जगल्याच्या माहितीची नोंद करण्यात आली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.८० टक्के इतकी आहे. तर याच तालुक्यांमध्ये संयुक्त वनव्यवस्थापन समितीने लागवड केलेल्या ९ लाख ४५ हजार ७९ रोपांपैकी ९ लाख ३३ हजार ६२५ इतकी रोपे जगल्याची गणना करण्यात आलेली आहे. रोपे जगण्याची ही टक्केवारी ९८.७९ टक्के इतकी आहे. (प्रतिनिधी)